इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला, रहिवाशांमध्ये वाढती उपयुक्ततता प्रतिबिंबित
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2026 5:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2026
आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 31 दशलक्ष डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे. लोकांमध्ये या ॲपचा वाढता वापर हे दर्शवतो की सेवा सहज उपलब्ध करून देण्याबाबत या ॲपबद्दलची विश्वासार्हता वाढीस लागत आहे.
जीवनमान सुलभ करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या आधार ॲपमुळे लोकांना आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, आपला पत्ता अद्ययावत करणे इत्यादी गोष्टी त्यांच्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज करता येऊ लागल्या आहेत.
आतापर्यंत 4 दशलक्ष लोकांनी नवीन आधार ॲपद्वारे आपले मोबाईल क्रमांक अद्ययावत केले आहेत. त्याचवेळी सुमारे 850,000 लोकांनी या ॲपद्वारे आपला पत्ता अद्ययावत केला आहे.
आधार ॲप, आधार धारकांना त्यांची ओळख सोबत बाळगण्यासाठी, दाखवण्यासाठी, कुणाला पाठवण्यासाठी आणि ती सत्यापित करण्यासाठी एक सुरक्षित, सोयीस्कर आणि गोपनीयतेला प्राधान्य देणारा मार्ग प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
या ॲपमध्ये नागरिकाभिमुख अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये एका क्लिकवर बायोमेट्रिक लॉक/अनलॉक, उपस्थितीच्या पडताळणीसाठी ‘फेस व्हेरिफिकेशन’ (चेहरा पडताळणी), प्रमाणीकरणाचा इतिहास तसेच पारंपरिक छापील व्हिजिटिंग कार्डऐवजी संपर्क तपशील सहजपणे शेअर करण्यासाठी क्यूआर-आधारित संपादनयोग्य संपर्क कार्ड यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत.
वापरण्यास अत्यंत सुलभ असलेले आधार ॲप दैनंदिन जीवनातील अनेक गरजांसाठी उपयुक्त ठरत आहे. यामध्ये ऑफलाइन व्हेरिफिकेशन सिकींग एंटिटी (OVSE) च्या QR कोडचे स्कॅनिंग करून हॉटेलमध्ये चेक-इन करणे याचा समावेश आहे. तसेच रुग्णालयात प्रवेश घेणे, अभ्यागतांचे व्यवस्थापन, कार्यक्रमांमधील प्रवेश, गिग वर्कर्स आणि सेवा भागीदारांची ओळख पडताळणे अशा अनेक वापरांचा समावेश आहे.
नवीन आधार ॲप, अँड्रॉइड आणि ॲपल (आय ओ एस) या दोन्ही मंचांवर उपलब्ध आहे. नागरिक ते खालील दुव्यांवरून उतरवून घेऊ शकतात:
अँड्रॉइड: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.pehchaan&hl=en_IN
आय ओ एस: https://apps.apple.com/in/app/aadhaar/id6744029871
* * *
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276727)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Assamese
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Tamil
,
Kannada