पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे वाहिली आदरांजली

Posted On: 20 JUN 2026 8:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत  पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की या पवित्र वनराया , प्राचीन आध्यात्मिक परंपरा व आदिवासी समुदायांनी निसर्गाशी जपलेले नाते यांचे प्रतीक आहेत.

अशा प्रथा व परंपरा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

या कालातीत परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी जपण्याची व वाढविण्याची वचनबद्धता पंतप्रधानांनी पुन्हा बोलून दाखविली.

पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर लिहीले आहे की,

राष्ट्रपतींसोबत पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा याठिकाणी गेलो होतो.

या पवित्र देवरायांच्या ठिकाणी आदरांजली वाहिली. या देवराया आदिवासी समुदायांच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते यांचे मूर्त स्वरुप आहेत. अशा प्रथा आणि परंपरा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत.

पुढील पिढ्यांसाठी या कालातीत परंपरा जपण्यासाठी व वाढविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

@rashtrapatibhvn”  

***

सुषमा काणे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2275895) अभ्यागत कक्ष : 45