पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जल व्यवस्थापन आणि लोकसहभाग यावरील लेख केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2026 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

पिण्याचे पाणी, स्वच्छता, नदी संवर्धन, सिंचन कार्यक्षमता, भूजल पुनर्भरण आणि सांडपाण्याचा पुनर्वापर यांसारख्या आव्हानांना शासकीय उपक्रमांद्वारे एका समग्र आणि परस्परसंबंधित दृष्टिकोनातून कसे हाताळले आहे, हे या लेखात,स्पष्ट केले आहे. सामायिक राष्ट्रीय हिताच्या  पूर्ततेसाठी उत्तरदायी शासन आणि सक्रिय लोकसहभाग, यामुळे साकारल्या गेलेल्या दशकातील कामगिरीवर यात  सविस्तरपणे चर्चा केली आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;

“ पिण्याचे पाणी, स्वच्छता, नदी संवर्धन, सिंचन कार्यक्षमता, भूजल पुनर्भरण आणि सांडपाण्याचा पुनर्वापर यांसारख्या आव्हानांना सरकारी उपक्रमांनी एका समग्र आणि परस्परसंबंधित दृष्टिकोनातून कसे हाताळले आहे, हे या लेखात, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी नमूद केले आहे.

सामायिक राष्ट्रीय हिताच्या पूर्ततेसाठी उत्तरदायी  शासन आणि सक्रिय लोकसहभाग, यामुळे  साकार झालेल्या, गेल्या दशकातील कामगिरीवर त्यांनी यात सविस्तर भाष्य केले आहे .”

सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2274589) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam