पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
Posted On:
15 JUN 2026 11:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली.
फेब्रुवारी 2026 मध्ये एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी यांच्यासोबत झालेल्या आपल्या पूर्वीच्या भेटीचे पंतप्रधानांनी स्नेहपूर्वक स्मरण केले. दोन्ही नेत्यांनी भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यात सुरू असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील वाढत्या संबंधांचे स्वागत केले. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी यांनी राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक कलाकारांनी 'वाराणसी शहर' या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेले चित्र प्रदर्शनही पाहिले. त्यांनी स्लोव्हाक शालेय विद्यार्थ्यांचे विशेष योगाभ्यास प्रात्यक्षिकही पाहिले.
राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष पेलेग्रिनी यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याबद्दल आणि भारत-स्लोव्हाकिया भागीदारीला दिलेल्या दृढ पाठिंब्याबद्दल आभार मानले.
* * *
नाना मेश्राम/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2273392)
अभ्यागत कक्ष : 31
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam