गृह मंत्रालय
विख्यात क्रीडापटू जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला तीव्र शोक
Posted On:
12 JUN 2026 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी विख्यात क्रीडापटू जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. तसेच, राणा यांचे कुटुंबीय आणि लाखो चाहत्यांचे सांत्वन केले आहे.
गृह मंत्री अमित शाह यांनी समाज माध्यम X वरील आपल्या संदेशात म्हटले आहे,
“विख्यात क्रीडापटू जसपाल राणा यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी देशासाठी आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून आणि प्रशिक्षक म्हणून युवा नेमबाजांना घडवून नेमबाजी क्षेत्रात भारताचे अजेय सामर्थ्य प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. राणा यांच्या निधनाने देशाचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंबीय आणि लाखो चाहत्यांचे सांत्वन करतो.”
सुषमा काणे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2272105)
अभ्यागत कक्ष : 57
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada