महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2026
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) 2026 याकरता महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत .
पुरस्कारासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. पूर्ण भरलेला अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे.
भारतात सध्या वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांपैकी 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील,बालके अर्ज करण्यास पात्र आहेत. स्व-नामांकन आणि तृतीय-पक्षाच्या शिफारसी दोन्ही स्वीकारल्या जातील. अर्जदारांना मूलभूत वैयक्तिक तपशील आणि पुरस्काराचा प्रकार भरावा लागेल आणि त्यानंतर एक अलीकडील छायाचित्र व सहाय्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि तिच्या प्रभावाबद्दलची माहिती (1000 शब्दांपर्यंत ) देखील सादर करावी लागेल.


पुढे दिलेल्या सहा क्षेत्रांमधे असाधारण कामगिरी करणाऱ्या बालकाला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. नामांकनासाठीचे प्रवर्ग खालीलप्रमाणे आहेत:
· शौर्य: ज्या मुलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना वाचवण्यासाठी विलक्षण धैर्य दाखवले
· क्रीडा: राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये गौरव प्राप्त केलेली मुले
· समाजसेवा: ज्या मुलांनी समाजाच्या विविध पैलूंमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय कार्यांत सक्रिय योगदान दिले आहे.
· विज्ञान आणि तंत्रज्ञान: मुलांनी तयार केलेले नवोपक्रम, संशोधन किंवा नमुने
· पर्यावरण: शाश्वत विकासाच्या पद्धती, जनजागृती मोहीम किंवा पर्यावरण-नवोपक्रम या क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे
· कला आणि संस्कृती: ज्या मुलांनी संगीत, नृत्य, लेखन, चित्रकला, सादरीकरण किंवा इतर कलांमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवून प्रावीण्य मिळवले आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय या निवेदनाद्वारे शाळा, संस्था, पालक, मार्गदर्शक तसेच सर्वसामान्य जनतेला आवाहन करत आहे की, त्यांनी अशा प्रतिभावान बालक आणि किशोरवयीन मुलांचा सक्रियपणे शोध घ्यावा आणि त्यांची नावे सुचवावीत.
चला, आपण हे सुनिश्चित करूया, की प्रत्येक पात्र मुलाला आपल्या तडफदार कामगिरीच्या बळावर चमकण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ मिळेल.
निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270829)
आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam