पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

18 वर्षाखालील आशिया चषक 2026 स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 06 JUN 2026 6:16PM by PIB Mumbai

 

18 वर्षाखालील आशिया चषक 2026 स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने उल्लेखनीय जिद्द आणि लढाऊ वृत्तीचे प्रदर्शन केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

भारतामधील महिला हॉकीची वाढती ताकद आणि खेळाडूंमध्ये असलेली अपार क्षमता या यशातून अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्पर्धांसाठी त्यांनी संघाला मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.

पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात सांगितले:

“18 वर्षाखालील आशिया चषक 2026 स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत संघाने उल्लेखनीय जिद्द दाखवली. हे यश भारतातील महिला हॉकीची वाढती ताकद आणि आपल्या खेळाडूंची अपार क्षमता दर्शवते. आगामी वाटचालीसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा.”

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2269857) अभ्यागत कक्ष : 64