आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

हायब्रीड ॲन्युइटी मोड अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-347B वरील हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी दरम्यानच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण तसेच देशगाव - जुलवानिया दरम्यानच्या 108.643 किलोमीटर रस्त्याच्ये 4 पदरी मार्गात रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2026 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA - Cabinet Committee on Economic Affairs) आज मध्य प्रदेशातील  राष्ट्रीय महामार्ग-347B च्या अद्यवतीकरणाच्या कामांना मंजुरी दिली. या अंतर्गत हायब्रीड ॲन्युइटी मोडवर 4,415.60 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी टप्प्यातील सध्याच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण केले जाईल. यासोबतच  देशगाव-जुलवानिया टप्प्याअंतर्गत विद्यमान 2 पदरी रस्त्याचे 108.643 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी रस्त्यात रुंदीकरण केले जाईल.

मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-347B वरील प्रस्तावित हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी तसेच देशगाव-जुलवानिया टप्प्याअंतर्गतच्या या अद्ययावतीकरण आणि सुधारणांमुळे बैतुल, खांडवा, खरगोन आणि बडवानी जिल्ह्यांमधील रस्त्यांचे भौगोलिकदृष्ट्या असलेले गंभीर दोष, धोकादायक वळणे आणि दाट वस्तीच्या भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.

याच  प्रकल्पाचा एक भाग म्हणून खरगोन जिल्ह्यात 16.20 किलोमीटर लांबीचा नवीन हरीतक्षेत्र बायपास देखील निर्माण केला जाईल.  या प्रकल्पामुळे वाहनांचा सरासरी वेग वाढेल, प्रवासाच्या वेळत बचत होईल आणि एकंदरीत रस्ते सुरक्षा, इंधन कार्यक्षमता तसेच वाहने हाताळण्याच्या खर्चातही कपात घडून येईल. परिणामी प्रादेशिक पातळीवरील दळणवळण तसेच सामाजिक आर्थिक विकासालाही मोठी गती मिळणार आहे.

Map of Corridor

Appendix - I: Project Details

Feature

Details

Project Name

Upgradation of the existing intermediate lane to 2 Lane with Paved Shoulder Standard (125.01 kms) of Hiwarkhedi -Roshni-Ashapur-Rudhy Section of NH-347B and widening of existing 2 lane to 4 lane from Deshgaon-Julwaniya Section of NH-347B of length (108. 643 kms) in the State of Madhya Pradesh on Hybrid Annuity Mode. (Total Length-233.653 kms)

Corridor

Betul-Khandwa-Vadodara

Length (km)

233.653

Total Civil Cost (Rs in Cr.)

2705.08

Land Acquisition Cost (Rs in Cr.)

432.77

Total Capital Cost (Rs in Cr.)

4415.60

Mode

Hybrid Annuity Mode (HAM)

Bypasses

Hiwarkhedi-Roshni-Ashapur-Rudhy Section

 

Bypass Length=70.39 km

Deshgaon-Julwaniya Section

 

 

Bypass Length = 54.273 km

Major Roads Connected

National Highways – NH-47, NH-753, NH-347BG and NH-52

State Highways – SH-15 and MDR

Economic / Social / Transport Nodes Connected

Airport: Indore & Nagpur

Railway Stations: Betul, Khandwa

Multi Model Logistic Park (MMLP) : Indore

Economic Nodes: 01 Textile Cluster, 02 Mega Food Park, 01 Industrial park, 02 Super Thermal Power Plants

Major Cities / Towns Connected

Betul, Khandwa, Khargone, Barwani

Employment Generation Potential

19.50 lakhs person-days (Direct) & 23.00 lakh person-days (Indirect)

***


राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2268578) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam