माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय जनसंवाद संस्थेने (आयआयएमसी) भारतीय माध्यम विश्वात भविष्यवेधी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता उभारण्यासाठी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एआय अकादमी सुरु केली


कृत्रिम बुद्धीमत्ता वेग आणि सर्जकता सुधारु शकते पण मानवी आकलन, अचूकता तसेच संपादकीय जबाबदारी नेहमीच एआय युगाच्या केंद्रस्थानी राहिली पाहिजे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव

देशातील 23 शहरांमधील 110 हून अधिक वृत्त कार्यालये आणि माध्यम व्यावसायिकांसाठी एआय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाल्यानिमित्त पदवीदान समारंभाचे आयोजन

Posted On: 29 MAY 2026 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2026

नवी दिल्ली येथील भारतीय जनसंवाद संस्थेने (आयआयएमसी) आज देशातील कृत्रिम बुद्धीमत्ता-संचालित माध्यम शिक्षण आणि क्षमता निर्मितीच्या उद्देशाने एआयएमई अकादमी (माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रांसाठी एआय अकादमी)सुरु केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी आयआयएमसीच्या कुलगुरू डॉ.प्रज्ञा पालीवाल गौर आणि गुगल डीपमाइंड, इंडिया कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ.मनीष गुप्ता यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील आयआयएमसी संस्थेत या अकादमीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात 10 आठवडे कालावधीच्या मिश्र कृत्रिम बुद्धीमत्ता कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता देखील साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 110 वृत्त कार्यालये  व्यावसायिक, माध्यम शिक्षक आणि देशभरातील 23 शहरांमधील 100 वृत्त कार्यालये  आणि माध्यम महाविद्यालयांचे आणि 10 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.

एआयएमई अकादमी: संस्थात्मक महत्त्वपूर्ण टप्पा  

एआयएमई अकादमी ही संस्था माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून परिकल्पित करण्यात आली आहे. क्षमता निर्मिती, संशोधन, नवोन्मेष आणि चिंतन, जबाबदार एआय धोरण विकास आणि धोरणात्मक सहयोग या पाच स्तंभांच्या आराखड्यावर उभारलेली ही अकादमी आयआयएमसीला पारंपरिक माध्यम प्रशिक्षणाकडून भविष्यासाठी सज्ज  माध्यम क्षमतेच्या दिशेने घेऊन जाण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे. केवळ भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणारे प्रशिक्षण अभ्यासक्रम  विकसित करणे, पत्रकारितेतील एआयवरील उपयोजित संशोधनाला पाठबळ देणे,वृत्त कार्यालयात  एआयच्या स्वीकाराच्या पद्धतींचे दस्तावेजीकरण करणे,तसेच भारतीय माध्यमांच्या परिसंस्थेत एआयच्या जबाबदार वापराला प्रोत्साहन देणे ही या अकादमीची उद्दिष्टे आहेत.

नवी दिल्ली, धेनकनाल, जम्मू, आयझॉल, अमरावती आणि कोट्टायम अशा सहा केंद्रांसह आयआयएमसी भारतभरात भाषा-विशिष्ट एआय क्षमता उभारण्यासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रीतीने स्थापित आहे.सदर अकादमी बहुभाषिक संवाद, सरकारी सेवांविषयी प्रसारण, ग्रामीण श्रोतावर्ग आणि संवैधानिक वैविध्यासह भारतीय तथ्यांना एआय आणि माध्यमांवरील जागतिक चर्चांमध्ये देखील समाविष्ट करेल अशी अपेक्षा आहे.

प्रमाणपत्र समारंभ:एआय कौशल्यधारकांचा सन्मान

प्रमाणपत्र वितरण समारंभ पदवीदान सोहळ्याच्या  केंद्रस्थानी होता आणि त्यात दूरदर्शन, आकाशवाणी, पत्रसूचना कार्यालय ,प्रकाशन विभाग तसेच आयआयएमसीमधील सहभागींना एआय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल औपचारिकरीत्या गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाने सरकारच्या सार्वजनिक सेवा संस्था आणि खासगी वृत्त संस्था  अशा दोन्हींमधील सहभागींना पायाभूत एआय साक्षरता आणि गुगलच्या एआय साधनांच्या वापरातील नैपुण्य यांनी सुसज्जित केले. यामध्ये नोटबुकएलएम, जेमिनी,एआयस्टुडीओ आणि पिनपॉईंट यांचा देखील समावेश होता.

सचिवांचे भाषण : कृत्रिम बुद्धीमत्ता सुविधा देणारी; पर्याय नव्हे

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना, सचिव चंचल कुमार यांनी सर्व सहभागी लोकांचे अभिनंदन केले आणि भारतीय माध्यमांसाठी या उपक्रमाचे परिवर्तनकारी महत्व अधोरेखित केले.

"आजचा प्रसंग केवळ एक समारंभ नाही, तर, भारतीय माध्यम संस्था  ज्याप्रकारे स्वतःला भविष्यासाठी सज्ज करत आहेत, ते दर्शवणारे एक व्यापक परिवर्तन सांगणारा हा कार्यक्रम आहे. आपल्यासमोर आज खरा प्रश्न हा नाही की एआयचा माध्यमांवर प्रभाव पडेल की नाही; ती प्रक्रिया तर  आधीच सुरू झाली आहे, अधिक महत्वाचा प्रश्न हा आहे, की आपले पत्रकार, संपादक, माध्यम तज्ञ आणि सार्वजनिक क्षेत्रातील संवाद कुशल व्यावसायिक एआय ला अधिक आत्मविश्वास, जबाबदारी आणि भारत- केंद्रीय  दृष्टिकोनाने आकार देतील का? असे ते पुढे म्हणाले.

भारतातील सार्वजनिक सेवेतील माध्यम संस्था, म्हणजेच दूरदर्शन, आकाशवाणी, पीआयबी आणि प्रकाशन विभाग यांच्याकडे मोठ्या व्यापक प्रमाणात संवाद साधण्याची जबाबदारी असते , त्यांना सर्व भाषा आणि सर्व प्रदेशांशी संवाद साधण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात सज्ज व्हावेच लागेल. त्यांनी पुढील बाबींवर भर दिला:

"एआयचा वापर तुमचा सहाय्यक म्हणून करता येऊ शकेल, मात्र तो संपादकीय कामांसाठी पर्याय ठरू शकत नाही. यामुळे गती सुधारू किंवा वाढवू शकता, मात्र गुणवत्तेशी तडजोड करून नाही. तो, आपल्या सर्जनशीलतेला पाठबळ देऊ शकतो, मात्र अस्सलपणाशी तडजोड करून नाही, मानवाची निर्णयक्षमता, आकलन, यांची भूमिका आजच्या एआय काळात अधिकच महत्वाची ठरणार आहे" असे त्यांनी सांगितले.

सचिव चंचल यांनी एआय बद्दलचा सरकारचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला."एआय, सकारात्मक, सहाय्यक ठरणारे आणि जबाबदार’ असले पाहिजे, त्याचा मूलभूत गाभा, ‘मेक एआय इन इंडिया” आणि “मेक एआय वर्क फॉर इंडिया" या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय निर्देशांवर आधारलेला आहे.

एआय कौशल्य प्रशिक्षण अभियानाविषयी:  

द गुगल न्यूज  उपक्रम हा  10 दिवसांचा हायब्रिड म्हणजे मिश्र स्वरूपाचा एआय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. भारतीय जनसंवाद संस्था- आय आय एम सीने गुगलसोबतच्या भागीदारीतून तो सुरु केला आहे. त्यासाठी , ‘भारत कसा जगतो’ याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे, मुद्रित, डिजिटल, ब्रॉडकास्ट, प्रादेशिक तसेच स्थानिक वृत्त कार्यालाये अशा सगळ्या क्षेत्रातील सहभागी यावेळी एकत्र आले होते.

महत्वाच्या कार्यक्रमांची माहिती:

• 23 शहरे आणि 10 पेक्षा अधिक भाषा बोलणारे 110+ सहभागी सदस्य.

• 100+ वृत्तकार्यालये , माध्यमांची महाविद्यालये आणि सार्वजनिक जनसंवाद संस्था.

• 40+ पेक्षा अधिक तास, एआय चे प्रशिक्षण आणि 1:1 मधील प्रत्येक सहभागी

• 50+ व्हाईब कोडिंग ॲप, (सहभागी लोकांनी बनवलेली ॲप्स) 

• देशभरातील सहा आयआयएमसी केंद्रात कॅम्पसमध्ये सार्वजनिक संवादाचे आयोजन

सुषमा काणे/संजना चिटणीस/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266769) अभ्यागत कक्ष : 23