पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री, सिनेट सदस्य पेनी वाँग यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
26 MAY 2026 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2026
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री, सिनेट सदस्य पेनी वाँग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीची लवचिकता सुनिश्चित करणे, यासारख्या क्षेत्रांमधील, भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या वाढत्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया मुक्त, खुल्या, सुरक्षित आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी यापुढेही एकत्र काम करतील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदी यांनी X वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
"ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री, सिनेटर पेनी वाँग यांना भेटून आनंद झाला. संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीची लवचिकता सुनिश्चित करणे, यांसारख्या क्षेत्रांमधील, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या वाढत्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर आम्ही चर्चा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया मुक्त, खुल्या, सुरक्षित आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी यापुढेही काम करतील."
@SenatorWong”
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265656)
अभ्यागत कक्ष : 15