पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सिक्किमचा समृद्ध वारसा आणि विकसित सिक्किम 2027 च्या दिशेने होत असलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला

Posted On: 24 MAY 2026 11:31AM by PIB Mumbai

 

सिक्किम राज्य स्थापनेला 51 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी लिहिलेला लेख, आपल्या समाजमाध्यमावर सामायिक केला.

हा लेख सामायिक करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की,  हा लेख कांचनजंगा वर प्रकाश टाकणारा असून त्यामध्ये सिक्किमची भूमी, स्मृती आणि सिक्कीमच्या जाणीवेचा गौरव करण्यात आला आहे.

आपल्या एक्स वर हा लेख सामायिक करतांना लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,

सिक्किम राज्याच्या स्थापनेला 51 पूर्ण होत असताना, केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी कांचनजंगाबद्दल लिहिले आहे; त्यांनी सिक्किमची भूमी, स्मृती आणि सिक्कीमच्या जाणीवेचा गौरव केला आहे. कांचनजंगाची पाच खजिने राज्याच्या वाटचालीला सतत प्रकाशमान करत असून विकसित सिक्किम 2027 चा मार्ग अधिक प्रशस्त करत आहेत. 

***

नोहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264719) अभ्यागत कक्ष : 10