माहिती आणि प्रसारण मंत्रालय
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरू
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कडून माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा
Posted On:
22 MAY 2026 7:49PM by PIB Mumbai
मुंबई, 22 मे 2026
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आपल्या 19 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा महोत्सव 15–21,जून 2026, दरम्यान मुंबईतील गोपाळराव देशमुख मार्गावरील एनएफडीसी-फिल्म्स डिव्हिजन संकुलात होणार आहे.
नॉन-फीचर सिनेमाला समर्पित असलेला दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित महोत्सव म्हणून ओळखला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) जगभरातील चित्रपट निर्माते, कथाकार आणि सर्जनशील व्यक्तींना या निमित्ताने एकत्र आणतो. या वर्षीची आवृत्ती माहितीपट, लघुपट , ऍनिमेशन आणि प्रायोगिक चित्रपटांची एक वैविध्यपूर्ण आणि आकर्षक श्रेणी सादर करेल, जी समकालीन सिनेमाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतिबिंब दर्शवते.
चित्रपट निर्मिती, डिजिटल कथाकथन आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे केंद्र म्हणून भारत प्रगती करत असताना, विविध मते प्रदर्शित करण्यात, कलात्मक संवादांना प्रोत्साहन देण्यात आणि चित्रपट निर्माते व आशय निर्मात्यांच्या नव्या पिढीला तयार करण्यात माध्यमांचे महत्त्वपूर्ण योगदान मिफ्फ जाणते. हा महोत्सव चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेला, सर्जनशील सहकार्याला आणि विविध संस्कृती व समुदायांमधील आकर्षक कथांच्या उत्सवाला प्रोत्साहन देणारे एक सर्वसमावेशक व्यासपीठ राहिले आहे.
नोंदणी तपशील
माध्यमांसाठी नोंदणी आता सुरू झाली असून ती 7, जून 2026 पर्यंत सुरू राहील. माध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणी विनामूल्य आहे. माध्यम प्रतिनिधी https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा खालील क्यूआर कोड स्कॅन करून माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करू शकतात.

19 वा मिफ्फ (MIFF) 2026
नॉन-फीचर (बिगर-कथात्मक) चित्रपट निर्मितीला समर्पित असलेला, दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि भव्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जाणारा, मिफ्फ (MIFF), अर्थात 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपट निर्मितीचा एक चैतन्यमय उत्सव म्हणून दीर्घकाळापासून लोकप्रिय ठरला आला आहे. 1990 मध्ये स्थापन झालेला आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत आयोजित केला जाणारा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ), आज एक प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून विकसित झाला असून, तो जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रपट प्रेमींना आकर्षित करतो.
19 वा मिफ्फ देखील एक मंत्रमुग्ध आणि समृद्ध करणारा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन घेऊन आला असून, यात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांची चोखंदळपणे निवडलेली मालिका, तसेच उद्योग-केंद्रित उपक्रमांची चित्ताकर्षक श्रेणी समाविष्ट आहे. 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) स्पर्धा विभागासाठी भारतासह 47 देशांमधून 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या महोत्सवात 42 पेक्षा जास्त भारतीय भाषा आणि भारताबाहेरील 30 पेक्षा जास्त भाषांमधील चित्रपट प्रदर्शित होणार असून, ही गोष्ट या महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता दर्शवते. जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात काही उत्कृष्ट माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन, दिग्दर्शकांचे पदार्पणाचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील. चित्रपट प्रदर्शनाबरोबरच, दुसऱ्या ‘डॉक बझार’ मध्ये, समृद्ध करणारे मास्टरक्लासेस आणि आयडीपीए द्वारे आयोजित ‘ओपन फोरम’, या महोत्सवातील सिनेमॅटिक आणि सर्जनशील आदान-प्रदान आणखी वाढवतील.
चला तर, मिफ्फ 2026 मध्ये कथाकथनाच्या चैतन्यमय विश्वात प्रवेश करूया, आणि प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि प्रेरणादायी स्वरांनी एकत्र येऊन साकारलेल्या माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट निर्मितीच्या अविस्मरणीय सोहळ्यात सहभागी होऊया.
19 व्या मिफ्फ साठी माध्यम मान्यता धोरण पुढील लिंकद्वारे पाहता येईल: link

* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264326)
अभ्यागत कक्ष : 81