पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींविषयी आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


एसवायएमआय आणि सनशाईन, ही एलपीजी घेऊन येणारी मालवाहू जहाजे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे भारताकडे रवाना; कांडला अणि न्यू मँगलोर बंदरांवर नियोजित वेळेत पोहोचण्याची अपेक्षा

ओमानच्या समुद्रात झालेल्या भारतीय नौकेसंदर्भातल्या घटनेनंतर जहाजावरील सर्व खलाशी सुरक्षित, भारतीय जहाजे अथवा परदेशी जहाजांवरील भारतीय खलाशांसंदर्भात गेल्या 72 तासांत, कुठल्याही अनुचित घटनेचे वृत्त नाही

Posted On: 14 MAY 2026 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मे 2026

पश्चिम आशियातील बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,  केंद्र सरकारने, आपल्या नागरिकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी, पत्रकार परिषदेतून, प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता :

अंमलबजावणी आणि देखरेखीसंबंधी उपाययोजना:

• एलपीजीची गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीची कारवाई सुरू असून, काल देशभरात 2000 हून अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले.  

• सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तसेच साठेबाजी आणि काळाबाजाराच्या घटनांची तपासणी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी काल देशभरातील सुमारे 1160 पेट्रोल पंप  आणि एलपीजी वितरकांची अचानक तपासणी केली.

• सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी अचानक तपासण्या अधिक कठोर केल्या असून,  401 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर कालपर्यंत 76 एलपीजी वितरकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

एलपीजी पुरवठा

देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची सद्यस्थिती :

• व्यावसायिक ऑनलाइन एलपीजी सिलिंडर बुकिंगचे काल प्रमाण सुमारे 99 टक्क्यांपर्यंत वाढले.

•  गेल्या तीन दिवसांत सुमारे 1.40 कोटी एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या तुलनेत सुमारे 1.39 कोटी एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वितरण उपाययोजना :

• गेल्या तीन दिवसांत सुमारे 1.90 लाख इतक्या 5 किलो एफटीएल सिलेंडरची विक्री करण्यात आली.

•  तीन एप्रिल 2026 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी पाच किलो एफटीएल सिलेंडर्सरसंदर्भात 11,870 हून अधिक जनजागृती शिबिरांचे आयोजन केले असून, त्यामध्ये 2.10 लाखांहून अधिक पाच किलो एफटीएल सिलेंडर्सची विक्री करण्यात आली.

• काल सुमारे 214 शिबिरांद्वारे अंदाजे 3,480 इतक्या पाच किलो एफटीएल सिलेंडर्सची विक्री करण्यात आली.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तारविषयक उपक्रम :

• मार्च 2026 पासून सुमारे 7.03 लाख इतक्या पीएनजी जोडण्यांमध्ये गॅस पुरवठा सुरू करण्यात आला असून, अतिरिक्त 2.72 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 9.75 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसेच, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 7.49  लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे.

• 13 मे 2026 पर्यंत MYPNGD.in या संकेतस्थळाद्वारे 57,200 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी त्यांच्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.

किरकोळ इंधनाची उपलब्धता आणि मूल्यविषयक उपाययोजना :

देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या नियमित किरकोळ किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या  विक्री केंद्रांवर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक ऑपरेशन्स

·एसवायएमआय ही एलपीजी  वाहक आणि मार्शल आयलंडचा ध्वज असलेली नौका, भारतासाठी 19,965 मेट्रिक टन एलपीजी घेऊन येत आहे. 21 परदेशी कर्मचारी असलेल्या या जहाजाने 13 मे 2026 रोजी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली असून, ते 16 मे 2026 रोजी कांडला येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

·एनव्ही सनशाईन ही व्हिएतनामचा ध्वज असलेली एलपीजी वाहक नौका, भारतासाठी 46,427 मेट्रिक टन एलपीजी घेऊन जात आहे. 24 परदेशी कर्मचारी असलेल्या या जहाजाने 14 मे 2026 रोजी हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली असून, ते 18 मे 2026 रोजी न्यू मंगलोर येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे.

· हाजी अली हे भारतीय यांत्रिक शिडाचे जहाज सोमालिया ते शारजाह प्रवासादरम्यान 13 मे 2026 रोजी पहाटे ओमानच्या सागरी हद्दीत एका दुर्घटनेला बळी पडले, त्यात जहाजाला आग लागली आणि ते बुडाले.

·या जहाजावरील सर्व 14 कर्मचाऱ्यांची ओमान कोस्ट गार्डने सुरक्षित सुटका केली असून ते ओमानमधील दिबा बंदरात पोहोचले आहेत. सर्व कर्मचारी सुरक्षित असून स्थानिक अधिकाऱ्यांसोबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

· भारत सरकार ओमानचे अधिकारी, भारतीय दूतावासातील अधिकारी आणि संबंधित सागरी संस्थांच्या सतत संपर्कात आहे.

·गेल्या 72 तासांत, एमएसव्ही हाजी अलीची घटना वगळता भारतीय जहाजे किंवा भारतीय खलाशी असलेल्या परदेशी जहाजांशी संबंधित इतर कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही. या प्रदेशातील इतर सर्व भारतीय खलाशी सध्या सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

· नौवहन महासंचालनालयाच्या नियंत्रण कक्षाने स्थापनेपासून आतापर्यंत 9,266 कॉल्स आणि 20,592 पेक्षा जास्त ई-मेल्स हाताळले आहेत. गेल्या 72 तासांत एकूण 377 कॉल्स आणि 834 ई-मेल्स प्राप्त झाले आहेत.

·नौवहन महासंचालनालयामार्फत मंत्रालयाने आतापर्यंत 3,158 पेक्षा जास्त भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी मदत केली आहे, यात गेल्या 72 तासांत आखाती प्रदेशातल्या विविध ठिकाणांहून परतलेल्या 62 खलाशांचा समावेश आहे.

 

 निलीमा चितळे/शैलेश पाटील/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2261218) अभ्यागत कक्ष : 10