इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन आधार ऍपला जनतेची मोठी पसंती, तीन महिन्यांत 21 दशलक्ष डाउनलोड्स


28 लाखांहून अधिक लोकांनी नवीन आधार ऍपद्वारे आपला मोबाईल क्रमांक केला अद्ययावत

आधार ऍपमुळे ओळख सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची गरज कमी होऊन वापरकर्त्याला स्वतःच्या माहितीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याच्या अधिकाराला मिळतेय चालना

Posted On: 06 MAY 2026 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2026

नवीन आधार ऍपला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन महिन्यांत 21 दशलक्ष (2.1 कोटी) हून अधिक डाउनलोड्स झाले आहेत. या ऍपमुळे सेवा, लोकांच्या हाताच्या बोटावर आल्या असून जीवन सुलभ झाले आहे.

लोक कधीही आणि कोठूनही मोबाईल नंबर आणि पत्ता अद्ययावत करण्यासारख्या विविध सेवा सहजपणे मिळवण्यासाठी आधार ऍपचा उयोग करत आहेत,असे आढळून आले आहे. आतापर्यंत 2.8 दशलक्ष (28 लाख) हून अधिक लोकांनी नवीन आधार ऍप वापरून आपले मोबाईल नंबर अद्ययावत केले आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे 6,00,000 लोकांनी पत्ता अद्ययावत करण्यासाठी या ऍपचा उपयोग केला आहे.

आधार ऍप हे पुढच्या पिढीचे म्हणजेच आधुनिक काळाशी सुसंगत मोबाईल ऍप्लिकेशन असून, आधार धारकांना त्यांची ओळख सोबत बाळगण्यासाठी, दाखवण्यासाठी, कुणाला पाठवण्यासाठी आणि ती सत्यापित करण्यासाठी एक सुरक्षित, सोयीस्कर आणि गोपनीयतेला प्राधान्य देणारा मार्ग प्रदान करण्याच्या उद्देशाने हे तयार करण्यात आले आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद केवळ रहिवाशांचा विश्वासच दर्शवत नाही, तर आधार सेवा अधिक सुलभ आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर बनवण्यात या नवीन ऍपची भूमिका देखील स्पष्ट करतो, ज्यामुळे आधार धारकांचे जीवन अधिक सुसह्य झाले आहे.

या ऍपमध्ये उपस्थितीच्या पडताळणीसाठी ‘फेस व्हेरिफिकेशन’ (चेहरा पडताळणी), एका क्लिकवर बायोमेट्रिक लॉक/अनलॉक करण्याची सुविधा, प्रमाणीकरणाचा इतिहास तसेच प्रत्यक्ष व्हिजिटिंग कार्डऐवजी संपर्क तपशील सहज शेअर करण्यासाठी क्यूआर-आधारित ‘संपादनयोग्य संपर्क कार्ड’ यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत.

वापरण्यास अत्यंत सुलभ असलेले आधार ऍप दैनंदिन जीवनातील अनेक गरजांसाठी उपयुक्त ठरत आहे. यामध्ये क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे हॉटेल चेक-इन करणे, वयोमर्यादा तपासणे, रुग्णालयात प्रवेश घेणे, अभ्यागतांचे व्यवस्थापन, कार्यक्रमांचे प्रवेश, गिग वर्कर्स  आणि सेवा भागीदारांची ओळख पडताळणे अशा अनेक वापरांचा समावेश आहे.

आधार ऍप वापरणे सोपे आहे आणि दैनंदिन अनेक कामांसाठी उपयोगी ठरते. हॉटेलमध्ये चेक-इन करताना, वयाची पडताळणी करताना,रुग्णालयात प्रवेश घेताना, कार्यक्रमस्थळी किंवा कार्यालयात प्रवेशासाठी, कामगार/सेवा देणाऱ्यांची ओळख तपासताना, ही सर्व कामे 'ऑफलाइन व्हेरिफिकेशन सीकिंग एंटिटी' (ओ व्ही एस ई) या ऑफलाइन पडताळणी व्यवस्थेचा क्यूआर कोड स्कॅन करून पटकन आणि सुरक्षितपणे करता येतात.

नवीन आधार ऍप, अँड्रॉइड आणि ऍपल (आय ओ एस) या दोन्ही मंचांवर उपलब्ध आहे.नागरिक ते खालील दुव्यांवरून उतरवून घेऊ शकतात:

अँड्रॉइड:   https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.pehchaan&hl=en_IN

आय ओ एस:  https://apps.apple.com/in/app/aadhaar/id6744029871


शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2258552) अभ्यागत कक्ष : 17