माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Posted On:
06 MAY 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2026
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, आपल्या 6 मे 2026 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, शशी शेखर वेम्पती यांची, सीबीएफसी म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते पदावर रूजु होण्याच्या दिवसापासून पुढची तीन वर्षे ही जबाबदारी सांभाळतील.

प्रसून जोशी यांची, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे, जोशी यांनी सीबीएफसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे ते पद रिक्त झाले होते. याच कारणाने वेम्पती यांची रिक्त जागी नेमणूक करण्यात आली.
शशी शेखर वेम्पती यांना प्रसारमाध्यमे, प्रसारण सेवा आणि सार्वजनिक संवाद या क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे, सीबीएफसी चा कारभार अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258417)
अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam