इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आधारच्या नवीन स्वरूपासंबंधी काही वृत्तांबाबतचा खुलासा
प्रविष्टि तिथि:
03 MAY 2026 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2026
या वर्षाच्या अखेरपर्यंत आधारचे स्वरुप बदलले जाऊ शकते आणि त्यावर केवळ एक छायाचित्र आणि क्यूआर कोड असू शकतो अशा आशयाच्या काही बातम्या आणि समाज माध्यमावरील पोस्ट फिरत आहेत.
मात्र यात कोणतेही तथ्य नाही, तसेच अशा प्रकारे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही.
अशा प्रकारच्या सर्व बातम्या आणि समाज माध्यमांवरील पोस्ट्समुळे नागरिकांच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण होत आहे.
नागरिकांनी अशा बातम्या आणि समाज माध्यमांवरील पोस्ट्सकडे दुर्लक्ष करावे, तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) त्यांच्या अधिकृत समाज माध्यम खाती तसेच पत्रसूचना कार्यालयाच्या माध्यमातून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या जाणाऱ्या अधिकृत निवेदनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले जात आहे. प्रसार माध्यमांनीही अशा प्रकारच्या तथ्यहीन माहितीचा प्रचार प्रसार करू नये असे आवाहन केले जात आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2257648)
आगंतुक पटल : 76