पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यातील दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले
Posted On:
15 APR 2026 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026
पंजाबमध्ये फतेहगढ साहिब जिल्ह्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याविषयी त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
"पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेची माहिती ऐकून दुःख झाले.ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो.जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi"
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252287)
अभ्यागत कक्ष : 9