पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी औषधनिर्माण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामर्थ्याविषयीचा एक लेख केला सामायिक
Posted On:
14 APR 2026 2:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
भारताचे औषधनिर्माण क्षेत्र आता जगाची फार्मसी या ओळखीपलीकडे जाऊन नवोन्मेषाचे केंद्र बनण्याकडे वाटचाल करत आहे, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. विद्यमान सरकारच्या कार्यकाळात व्यापक संशोधन आणि विकास, 'बायोलॉजिक्स', 'बायोसिमिलर्स' आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींवर विशेष भर देण्यात आला असून या क्षेत्रात जागतिक स्पर्धेत अग्रस्थानी राहण्यासाठी भारत सज्ज होत आहे, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे :
''जगाची फार्मसी ते नवोन्मेषाचे केंद्र, भारताचे औषधनिर्माण क्षेत्र मूल्यसाखळीत सातत्याने प्रगती करत आहे. विद्यमान सरकारच्या कार्यकाळात व्यापक संशोधन आणि विकास, 'बायोलॉजिक्स', 'बायोसिमिलर्स' आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींवर विशेष भर देण्यात आला आहे.
या क्षेत्रात जागतिक स्पर्धेत अग्रस्थानी राहण्यासाठी भारत कशा प्रकारे सज्ज होत आहे, याविषयी केंद्रीय मंत्री @JPNadda यांनी केलेले हे चिंतनपर लिखाण प्रत्येकाने आवर्जून वाचण्यासारखे आहे!”
https://www.thehindubusinessline.com/opinion/india-moving-up-the-pharma-value-chain/article70858640.ece”
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251830)
अभ्यागत कक्ष : 56
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam