पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथे झालेल्या नाव दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला
Posted On:
10 APR 2026 6:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथे बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या दुर्दैवी अपघातात प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांविषयी पंतप्रधानांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आपली प्रार्थना,असे मोदी यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे असेही पंतप्रधानांनी पुढे नमूद केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले:
"उत्तर प्रदेशातील मथुरा इथे बोट उलटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेने दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे."
***
निलिमा चितळे/निखिलेश चितळे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250970)
अभ्यागत कक्ष : 15