पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या आरोग्य आणि निरामयता प्रणालीमध्ये होमिओपथीच्या अविभाज्य भूमिकेवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 10 APR 2026 1:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा एक लेख सामायिक केला, ज्यामध्ये होमिओपथी भारताच्या बहुविध आरोग्य आणि निरामयता प्रणालीचा अविभाज्य भाग कशी बनली आहे, याचे विवेचन करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

"या लेखामध्ये, केंद्रीय राज्यमंत्री @mpprataprao यांनी होमिओपथी भारताच्या वैविध्यपूर्ण आरोग्य आणि निरामयता प्रणालीचा एक अविभाज्य भाग कसा बनली आहे, हे स्पष्ट केले आहे. होमिओपथीतून आपल्याला एक सर्वसमावेशक आणि रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन मिळतो.”

समुदायाशी असलेल्या सखोल नात्यासह आणि शाश्वत दृष्टिकोनासह होमिओपथी, विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग दाखवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

***

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2250767) अभ्यागत कक्ष : 17