भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026


आसाम आणि पुदुचेरीमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक मतदानाची नोंद

Posted On: 09 APR 2026 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

 

1. आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 3 राज्यांत   (कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा) विधानसभेच्या  4 जागांच्या पोटनिवडणुकांसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि काही किरकोळ घटना वगळता हे मतदान  शांततेत पार पडले.

2. आसाम आणि पुदुचेरीमध्ये आज अनुक्रमे 85.38% आणि  89.83% इतक्या आतापर्यंतच्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली.  यापूर्वी, आसाम आणि पुदुचेरीमधील सर्वाधिक मतदान अनुक्रमे 84.67% (2016 मधील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ) आणि 86.19% (2011 मधील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ) इतके होते.

3.मतदानातील सहभागाचा तपशील (%)* खालीलप्रमाणे आहे+:

State/UT

Poll Percentage (%)

Male

Female

3rd Gender

Total

General Elections to Legislative Assembly

Assam

84.80

85.96

36.84

85.38

Kerala

75.01

80.86

57.04

78.03

Puducherry

88.09

91.33

91.81

89.83

Bye-elections to AC

Karnataka

1.  Bagalkot-24

68.69

68.68

0.07

68.70

2.  Davanagere South-107

68.55

68.55

0.08

68.55

Nagaland

1.  Koridang-28

79.34

85.14

-

82.21

Tripura

1.  Dharmanagar-56

79.80

80.26

-

80.04

*पीआरओनी स्वतः ECINet वर अपलोड केलेल्या माहितीनुसार 3,469 मतदान केंद्रांवरील माहिती अद्याप अद्ययावत व्हायची आहे.

+ही माहिती तात्पुरती असून, यामध्ये सेवा मतदार आणि टपाल मतपत्रिकांचा समावेश नाही. अंतिम आकडेवारी ECI इंडेक्स कार्डद्वारे दिली जाईल.

4.मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. एस. एस. संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह  आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये प्रथमच 100%  मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंगद्वारे मतदानावर बारीक  लक्ष ठेवले.

5.आसाम आणि केरळ ही राज्ये आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एकूण 296 विधानसभा मतदारसंघांमध्ये तसेच 3 राज्यांच्या  (कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा)  4  विधानसभा जागांच्या  पोटनिवडणुकांसाठी,  आज मतदान झाले.

6. आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा (IEVP) भाग म्हणून, 22 देशांमधील  38 प्रतिनिधीनी  निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण केले.

7. जिल्हानिहाय  आणि विधानसभा मतदारसंघ-निहाय मतदानाची अंदाजित आकडेवारी ECINet ॲपवर उपलब्ध आहे.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250632) अभ्यागत कक्ष : 93