आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथील एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड या कंपनीच्या खर्चात आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
{हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त उपक्रम}
Posted On:
08 APR 2026 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) प्रकल्पाचा खर्च 43,129 कोटी रुपयांवरून 79,459 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) द्वारे 8,962 कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीनंतर एचपीसीएलची भांडवली बाजारातील एकूण गुंतवणूक 19,600 कोटी रुपये इतकी होईल.
अंमलबजावणीचे धोरण आणि उद्दिष्ट्ये :
एचआरआरएल रिफायनरी ही एक अत्यंत गुंतागुंतीची रिफायनरी असून, तिच्या उत्पादनांपैकी 26% पेक्षा जास्त पेट्रोकेमिकल उत्पादने आहेत.. प्रतिवर्ष 1 दशलक्ष मेट्रिक टन (MMTPA) पेट्रोल आणि 4 दशलक्ष मेट्रिक टन डिझेलच्या उत्पादनासोबतच, यातून प्रतिवर्षी 1 दशलक्ष मेट्रिक टन पॉलीप्रोपिलीन, 0.5 दशलक्ष मेट्रिक टन एलएलपीडीई (लिनियर लो डेन्सिटी पॉलीथिलीन),0.5 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलीथिलीन) आणि सुमारे 0.4 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष बेंझिन, टोल्युइन व ब्युटाडाइन यांचे उत्पादन होईल. ही सर्व उत्पादने वाहन उद्योग, औषधनिर्माण, रंग, पॅकेजिंग उद्योग इत्यादी क्षेत्रांच्या ऊर्जा आणि औद्योगिक परिसंस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.या प्रकल्पामुळे ऊर्जा क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होऊ,आणि पेट्रोकेमिकल्सच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी होईल.याच्या व्यावसायिक कार्यान्वयनाची नियोजित तारीख (SCOD) 1 जुलै 2026 आहे.
रोजगार निर्मितीच्या क्षमतेसह प्रमुख परिणाम :
देशांतर्गत ऊर्जेच्या आणि पेट्रोकेमिकल्सच्या वाढत्या गरजा, आवश्यकता आणि विशेष उत्पादनांचे उत्पादन लक्षात घेता, एचआरआरएल (HRRL) हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्यामुळे देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि परिणामी परकीय चलनात बचत होईल.याशिवाय, हा प्रकल्प एका मागास भागाचे औद्योगिकीकरण घडवून आणण्यात, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या मंगला क्रूडच्या वापरास हातभार लावेल आणि भारताला रिफायनिंग हब म्हणून ओळख देण्यास मदत करेल..या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान, एचआरआरएलने रिफायनरी युनिट्सच्या बांधकामाच्यावेळी अंदाजे 25,000 कामगारांसाठी रोजगाराच्या संधी विविध भागधारकांकडून निर्माण केल्या गेल्या होत्या.
पार्श्वभूमी :
एचआरआरएल , पचपदरा (जिल्हा - बालोतरा, राजस्थान) हे प्रतिवर्ष 9 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता असलेले , तसेच 2.4 दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेची पेट्रोकेमिकल उत्पादन क्षमता असलेले एक 'ग्रीनफील्ड' रिफायनरी-कम-पेट्रोकेमिकल संकुल आहे. हा प्रकल्प HRRL द्वारे राबवला जात असून, HPCL आणि राजस्थान सरकार यांचा हा एक संयुक्त उपक्रम (JV) असून; यामध्ये त्यांचा अनुक्रमे 74% आणि 26% इतका समभाग आहे.
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250207)
अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam