पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तो लाम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 07 APR 2026 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झालेले तो लाम यांचे हार्दिक अभिनंदन केले.

नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील काळाच्या कसोटीवर टिकलेली मैत्री अधिक मजबूत होत राहील. मोदी पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमधील लोकांच्या आणि या प्रदेशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी व्यापक सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास आपण उत्सुक आहोत.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:

"व्हिएतनामच्या  अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  तो लाम यांचे हार्दिक  अभिनंदन. मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या दोन देशांमधील काळाच्या कसोटीवर टिकलेली मैत्री अधिक मजबूत होत राहील. आपल्या लोकांच्या आणि प्रदेशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आपली व्यापक सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी  एकत्रितपणे काम करण्यास मी उत्सुक आहे."


नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249743) अभ्यागत कक्ष : 21