पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशच्या मार्कापुरम जिल्ह्यातील भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


पंतप्रधानांची आर्थिक मदतीची घोषणा

Posted On: 26 MAR 2026 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2026

 

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांचे पंतप्रधानांनी सांत्वन केले असून जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना केली आहे

पंतप्रधानांनी दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएनएनआरएफ) प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती आमच्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे होवोत.

पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल: PM @narendramodi”

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245770) अभ्यागत कक्ष : 22