पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
जागतिक उर्जा सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या व्यत्ययांबाबत दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
जलवाहतुकीचे मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वाचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय उर्जा सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या आणि क्षेत्रीय सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला
सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याच्या भारताच्या दृढ कटिबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
24 MAR 2026 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.
दोन्ही नेत्यांनी जागतिक उर्जा सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या अडथळ्यांवर अधिक भर देत पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीबाबत चर्चा केली.
संपूर्ण जगाच्या हितासाठी जलवाहतुकीचे मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.
दोन्ही नेत्यांनी भारत-श्रीलंका उर्जा सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या आणि क्षेत्रीय सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांनी भारताचे ‘शेजारी देश सर्वप्रथम’ धोरण आणि ‘महासागर’ संकल्पनेला अनुसरत, सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याच्या भारताच्या दृढ कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2244778)
आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam