पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून क्षयरोग निर्मूलनासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्नांबाबतचा लेख सामायिक
Posted On:
24 MAR 2026 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लिहिलेला लेख समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे.
या लेखात लोकसहभागातून क्षयरोग निर्मूलनाच्या देशाच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे. भारताने संशोधन व विकासात सातत्यपूर्ण गुंतवणूक केली असून, भागीदारी मजबूत केल्या आहेत आणि क्षयरोगाच्या निदानासाठी स्वदेशी बनावटीच्या साधनांची निर्मिती केल्याचे लेखात मांडले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील संदेशात म्हटले आहे,
“केंद्रीय मंत्री @JPNadda यांनी लोकसहभागातून क्षयरोग निर्मूलनाच्या देशाच्या प्रवासाविषयी लेखन केले आहे. भारताने संशोधन व विकासामध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक केली आहे, भागीदारी मजबूत केल्या आहेत आणि क्षयरोगाच्या निदानासाठी स्वदेशी बनावटीच्या साधनांची निर्मिती केली आहे, या बाबी लेखात ठळकपणे मांडल्या आहेत.”
* * *
नितीन फुल्लुके/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244702)
अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada