गृह मंत्रालय
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या ‘हुतात्मा दिना’निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वाहिली आदरांजली
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे तरुणांना त्यांच्या मातृभूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारे आदर्श होते
त्यांच्या कथा हृदयामध्ये देशभक्तीची गहन भावना निर्माण करतात
Posted On:
23 MAR 2026 2:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2026
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या ‘हुतात्मा दिना’निमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
‘एक्स’ वरील संदेशात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणतात की, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आदर्श होते आणि त्यांनी त्यांचे विचार तसेच कृतीद्वारे तरुणांना मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. शाह म्हणाले की, मातृभूमीच्या मुक्ततेसाठी स्वतःहून फासावर चढणाऱ्या या शूरवीरांच्या गाथांचे स्मरण केल्यावर आपले हृदय देशभक्तीच्या गहन भावनेने भरून जाते.”
* * *
नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243856)
अभ्यागत कक्ष : 11