पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची बहारीनच्या राजांसमवेत चर्चा
पंतप्रधानांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा; ऊर्जा आणि नागरी सुविधांवरील हल्ल्यांचा केला निषेध
Posted On:
20 MAR 2026 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहारीनचे राजे हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी फलदायी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना ईद-उल-फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर विचारविनिमय केला.
बहारीनचे राजे हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा केली आणि ईद-उल-फित्रनिमित्त त्यांना आणि बहारीनच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी उभय नेत्यांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा मोदी यांनी निषेध केला. अशा हल्ल्यांचा जागतिक अन्न, इंधन आणि खत सुरक्षेवर दुष्परिणाम होतो, असे मोदी म्हणाले. त्यांनी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याच्या महत्वाचा पुनरुच्चार केला.पंतप्रधानांनी बहारीनमधील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल राजांचे आभार मानले.
मोदी यांनी ‘X’ वर लिहिले: “बहरीनचे राजा हमद बिन ईसा अल खलीफा यांच्याशी फलदायी चर्चा झाली. ईद-उल-फित्रनिमित्त त्यांना आणि बहारीनच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
पश्चिम आशियातील सद्य परिस्थितीवर आम्ही चर्चा केली. ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा जागतिक अन्न, इंधन आणि खत सुरक्षेवरचा दुष्परिणाम अधोरेखित करत निषेध केला.
समुद्री मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. बहारीनमधील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल राजांचे आभार मानले.”
* * *
निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243198)
अभ्यागत कक्ष : 16