पंतप्रधान कार्यालय
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2026 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या (आयजीएनसीए) विश्वस्तांची भेट घेतली आणि भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला अधिक लोकप्रिय करण्याबाबत विविध पैलूंवर चर्चा केली.
पंतप्रधानांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या विश्वस्तांशी, सांस्कृतिक संवर्धनाच्या प्रवासात अधिकाधिक लोकांना कसे सहभागी करून घेता येईल यावर चर्चा केली. या संवादादरम्यान, पंतप्रधान आणि विश्वस्तांनी डिजिटल आणि तळागाळातील उपक्रमांद्वारे संपर्क अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली आणि भारताचा समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कलाकारांना आणि विद्वानांना पाठिंबा देण्याच्या महत्त्वावर भर दिला.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:
"आयजीएनसीएच्या विश्वस्तांची भेट घेतली आणि भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला अधिक लोकप्रिय करण्याबाबत विविध पैलूंवर चर्चा केली. या प्रवासात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे, डिजिटल आणि तळागाळातील उपक्रमांद्वारे संपर्क अधिक मजबूत करणे आणि आपल्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कलाकारांना आणि विद्वानांना पाठिंबा देण्याचे मार्ग शोधण्याबाबत विचारविनिमय केला."
* * *
राधिका अघोर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2242766)
आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam