आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये हायब्रीड ॲन्यूईटी पद्धतीने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली-फरीदाबाद-वल्लभगड-सोहना टोकापासून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत ग्रीनफिल्ड जोडणी मार्गाच्या उभारणीसाठी खर्चाच्या सुधारित अंदाजाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 MAR 2026 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीने आज उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये हायब्रीड ॲन्यूईटी पद्धतीने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली-फरीदाबाद-वल्लभगड-सोहना टोकापासून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 3630.77 कोटी रुपये खर्चून  बांधण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड जोडणी मार्गाच्या उभारणीसाठी खर्चाच्या सुधारित अंदाजाला मंजुरी दिली.

ही 31.42 किमी लांबीची ही प्रकल्प मार्गिका,  दक्षिण दिल्ली, फरीदाबाद आणि गुरुग्रामपासून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट आणि वेगवान जोडणी सुविधा उपलब्ध करून देऊन राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर)आर्थिक विकास तसेच लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना देईल.

ही मार्गिका पूर्व बाह्यचक्राकार द्रुतगती मार्ग, यमुना द्रुतगती मार्ग तसेच समर्पित मालवाहू मार्गिके(डीएफसी) ला छेदणार असून त्यामुळे  बहु वाहतुकीचासमन्वय साधणे शक्य होईल. ही उन्नत मार्गिका म्हणजे केवळ एक संरचनात्मक सुधारणा नाही तर नागरी परिवर्तन, प्रादेशिक जोडणी तसेच राष्ट्रीय लॉजिस्टिक्स क्षमता निर्माण करण्याचा धोरणात्मक प्रयत्न आहे. जेवर विमानतळ, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग  यांच्या क्षमतांचा संपूर्ण वापर करून घेण्यासाठी तसेच फरीदाबादमध्ये शाश्वत शहरी विकास सुनिश्चित करण्यासाठी, या मार्गिकेची उभारणी आवश्यक आहे.

सुमारे 11 किमी लांबीचा हा प्रकल्प उन्नत महामार्गाच्या स्वरुपात विकसित करण्यात येणार आहे. तो डीएनडी-वल्लभगड बाह्यवळण आणि जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या दरम्यान ग्रीनफिल्ड जोडणीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, या भागाला दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडून घेणार आहे.  

ही उन्नत मार्गिका, अत्यंत गर्दीच्या शहरी भागातून आणि 2031 च्या प्रस्तावित फरीदाबाद बृहद आराखड्यासाठी निश्चित केलेल्या भागातून जाणार आहे. या प्रस्तावित उन्नत मार्गिकेसाठी 689.24 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून हरियाणा सरकारने या उन्नत मार्गिकेसाठी 450 कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली-फरीदाबाद-वल्लभगड-सोहना टोकापासून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठीच्या ग्रीनफिल्ड जोडणी मार्गासाठी प्रकल्प अलाईनमेंट नकाशा

 


राधिका अघोर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2237820) अभ्यागत कक्ष : 10