पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद

प्रविष्टि तिथि: 02 MAR 2026 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.

पंतप्रधानांनी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. जॉर्डनमधील जनतेचे कल्याण,  शांतता आणि सुरक्षितता यांसाठी भारताचा पाठिंबा कायम असल्याची त्यांनी पुनःपुष्टी केली.

या कठीण काळात जॉर्डनमधील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी राजांचे आभार मानले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले:

“जॉर्डनचे राजे महामहिम अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी संवाद साधला. प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबद्दल आपली  तीव्र चिंता  व्यक्त केली. जॉर्डनमधील जनतेचे कल्याण,  शांतता आणि सुरक्षितता यांसाठी आमचा पाठिंबा कायम आहे. या कठीण काळात जॉर्डनमधील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2234802) आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam