शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा संगम (पर्व 6 वे) साठी ऑनलाइन नांवनोंदणीला 2 मार्च 2026 पासून सुरुवात


शिक्षण मंत्रालयाचे देशभरातील युवकांना सहभागाचे आवाहन

एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत 22 उच्च शिक्षण संस्थांमध्ये देशव्यापी युवा आदानप्रदान कार्यक्रम

Posted On: 02 MAR 2026 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

शिक्षण मंत्रालयाने 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमातील युवा संगमच्या 6 व्या पर्वासाठी  ऑनलाइन नांवनोंदणी पोर्टलचे आज उद्घाटन केले.

युवा संगम हा केंद्र सरकराच्या उच्च शिक्षण विभागाचा पथदर्शी युवा आदानप्रदान  कार्यक्रम आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील युवा भावनिक बंध मजबूत करणे व परस्परसद्भाव वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशातील विविध ठिकाणांना भेट आयोजित करुन या कार्यक्रमाद्वारे 'विविधतेत एकता' या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाते.

18 ते 30 वयोगटातील इच्छुक युवा, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस एनवायकेएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक यासाठी पात्र असतील. पात्र इच्छुकांनी https://ebsb.aicte-india.org आणि https://ekbharat.gov.in या पोर्टलद्वारे नांवनोंदणी करावी.

युवा संगमच्या 6 व्या पर्वासाठी देशभरातील 22 उच्च शिक्षण संस्थांना आयोजक संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या युवकयुवतींना त्यांच्या भेटीसाठी ठरलेल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात पाच ते सात दिवस (प्रवासाचे दिवस वगळून) शैक्षणिक व सांस्कृतिक भेटी देता येतील. 

Pairing of States/UTs and HEIs for Yuva Sangam Phase - VI

S.No.

State / UT (Sender)

Institution Name

Paired State / UT (Receiver)

Paired Institute Name

1

Andhra Pradesh

IIT Tirupati

Maharashtra

IISER Pune

2

Delhi

IIT Delhi

Chhattisgarh

IIT Bhilai

3

Karnataka

IIIT Dharwad

Rajasthan

MNIT Jaipur

4

Punjab

IIT Ropar

Bihar

IIT Patna

5

Jammu & Kashmir and Ladakh

IIM Jammu

Kerala & Lakshadweep

IIM Kozhikode

6

Meghalaya

IIM Shillong

Telangana

NIT Warangal

7

Madhya Pradesh

IIT Indore

Jharkhand

IIT Dhanbad

8

Himachal Pradesh

CU of Himachal Pradesh

Puducherry

NIT Puducherry

9

Arunachal Pradesh

NERIST

Uttar Pradesh

IIM Lucknow

10

Haryana

NIT Kurukshetra

Tripura

NIT Agartala

11

Gujarat & DNH & DD

IIM Ahmedabad

Odisha

NIT Rourkela

सोनाली काकडे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2234788) अभ्यागत कक्ष : 11