मंत्रिमंडळ
पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा बाबींवरील मंत्रिमंडळ समितीची बैठक
प्रविष्टि तिथि:
01 MAR 2026 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2026
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा बाबींवरील मंत्रिमंडळ समितीची बैठक आज संध्याकाळी झाली.
इराणमध्ये 28 फेब्रुवारी रोजी झालेले हवाई हल्ले आणि त्यानंतर अनेक आखाती देशांमधील हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीबाबत समितीला माहिती देण्यात आली. या क्षेत्रात मोठ्या संख्येने राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेबाबत समितीने गंभीर चिंता व्यक्त केली.
समितीने या क्षेत्रात प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना आणि नियोजित परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा तसेच प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक व व्यावसायिक क्रियाकलापांवर होणाऱ्या व्यापक परिणामांचा आढावा घेतला.
समितीने, या घडामोडींचे परिणाम भेडसावत असलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक आणि व्यवहार्य उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले. संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात यावा आणि संवाद व मुत्सद्देगिरीचे मार्ग पुन्हा खुले होण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234444)
आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam