पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
20 FEB 2026 9:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायक यांची भेट घेतली. दिसानायक हे आज नवी दिल्ली येथे भारत-एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या राज्य भेटीनंतर राष्ट्रपती दिसानायक यांचा हा दुसरा भारत दौरा आहे.
दोन्ही नेत्यांनी एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधानांच्या श्रीलंकेच्या भेटीसह अलीकडील उच्चस्तरीय भेटींमधून झालेल्या द्विपक्षीय उपक्रमांमधील प्रगतीचा आढावा घेतला. नेत्यांनी भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी या प्रमुख क्षेत्रातील सहकार्य अधिक गतिमान करण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर दिला. विकास उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी तंत्रज्ञानाची भूमिका ओळखून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतही त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
चक्रीवादळ दितवाह नंतर भारताने दिलेल्या जलद आणि बिनशर्त मदतीबद्दल राष्ट्रपती दिसानायक यांनी भारताचे आभार मानले. प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून, भारताने आपत्कालीन मदत पुरवठा केला तसेच 'ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत शोध आणि बचाव कार्यात मदत केली. 45 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या मदत पॅकेजद्वारे पुनर्बांधणी आणि पुनरुत्थानासाठी भारताकडून देण्यात येत असलेल्या पाठिंब्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या पवित्र देवनिमोरी अवशेषांच्या प्रदर्शनाच्या यशाचे स्वागत करताना, भारत श्रीलंका भागीदारीला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांची भक्कम परंपरा विशेष दूर देते असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.
श्रीलंकेच्या शाश्वत विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि हिंद महासागर प्रदेशातील स्थैर्याला हातभार लावण्याकरिता द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्तपणे काम करण्याचे नेत्यांनी मान्य केले.
***
हर्षल आकुडे /श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2231106)
अभ्यागत कक्ष : 5