पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कझाकस्तानच्या पंतप्रधानांची भेट
Posted On:
18 FEB 2026 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भारताने आयोजित केलेल्या ‘एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कझाकस्तानचे पंतप्रधान महामहिम ओलशाज बेकटेनोव्ह यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेत पंतप्रधान बेकटेनोव्ह यांच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांचा सहभाग सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उभय राष्ट्रांच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित करतो. दोन्ही नेत्यांनी राजकीय, व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा, संपर्क यंत्रणा, ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि लोकांमध्ये परस्पर संबंध यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला.
समाज माध्यम ‘एक्स’वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
“पंतप्रधान ओलशाज बेकटेनोव्ह आणि माझी आज प्रारंभी भेट झाली. त्यांच्या भेटीमुळे भारत-कझाकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल. व्यापार, ऊर्जा, महत्त्वपूर्ण दुर्मिळ खनिजे, दुर्लभ पृथ्वी, संरक्षण, संपर्क साधने आणि अंतराळ क्षेत्र यांच्यामध्ये द्विपक्षीय सहकार्यासाठी प्रचंड संधी आहेत. आपण आपली मैत्री नवीन उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करत राहू.
@PrimeMinisterEn”
“Бүгін ертерек Премьер-министр Олжас Бектенов мырзамен кездестім. Оның сапары Үндістан мен Қазақстан арасындағы стратегиялық серіктестікті одан әрі тереңдете түседі. Сауда, энергетика, маңызды минералдар, сирек жер элементтері, қорғаныс, көлік-логистика байланысы және ғарыш салаларында екіжақты ынтымақтастықты дамытуға зор мүмкіндік бар. Достығымызды жаңа белестерге көтеру үшін бірлесіп жұмыс істеуді жалғастырамыз.
@PrimeMinisterEn”
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230022)
अभ्यागत कक्ष : 9