पंतप्रधान कार्यालय
एस्टोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
18 FEB 2026 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष अलार कारिस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भविष्यकालीन तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
"तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या एस्टोनियाचे अध्यक्ष अलार कारिस यांच्याशी उत्तम बैठक झाली. आपल्या आर्थिक भागीदारीला अधिक बळकटी कशी देता येईल, विशेषत: भारत-ईयु मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात चर्चा झाली, जो एक ऐतिहासिक करार आहे. आम्ही भविष्यकालीन तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याबाबतही बोललो.
@AlarKaris"
“Oli suurepärane kohtumine Alar Karisega, Eesti Vabariigi Presidendiga - riigiga, mis on teinud märkimisväärseid edusamme tehnoloogia ja tehisintellekti valdkonnas. Arutasime võimalusi meie majanduspartnerluse edasiseks tugevdamiseks, eriti India ja ELi vabakaubanduslepingu, mis on ajalooline kokkulepe. Samuti rääkisime koostööst futuristlike tehnoloogiate, energiahalduse, oskuste ja muud.
@AlarKaris”
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230008)
अभ्यागत कक्ष : 8