पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

स्पेनच्या अध्यक्षांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 18 FEB 2026 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी भारत-स्पेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. या चर्चेत विशेषतः संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांवर भर देण्यात आला.

दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरे करत आहेत.

X या समाज माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:

"दिल्लीमध्ये राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ यांच्यासोबत फलदायी बैठक झाली. विशेषतः संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात भारत-स्पेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. आपले देश 2026 हे भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरे करत आहेत. यामुळे लोकांमधील संबंध अधिक दृढ होतील. विद्यापीठांचे एक मोठे शिष्टमंडळ भारतात आल्याचे पाहून आनंद झाला. यामुळे आपल्या लोकांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल.

युरोपियन युनियन सोबत झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार स्पेनसोबतच्या आर्थिक भागीदारीवर अत्यंत सकारात्मक परिणाम करेल आणि आपल्या देशांच्या नागरिकांसाठी नवीन संधी निर्माण होतील.

@sanchezcastejon”

 

“Tuve una reunión productiva con el presidente Pedro Sánchez en Delhi. Hablamos de formas de fortalecer la amistad entre la India y España, especialmente en ámbitos como la defensa, la seguridad, la tecnología y otros.

Nuestros países celebran 2026 como el Año India-España de la Cultura, el Turismo y la IA. Esto profundizará los vínculos entre nuestros pueblos. Me alegra ver que también ha venido a la India una gran delegación de universidades. Esto también contribuirá en gran medida a acercar a nuestros pueblos.

El histórico acuerdo de libre comercio con la UE tendrá un impacto muy positivo en la asociación económica con España y brindará nuevas oportunidades a los ciudadanos de nuestros países.

@sanchezcastejon”

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2229585) अभ्यागत कक्ष : 16