माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे दालन एआय-केंद्रित परिसंवाद आणि सत्रांचे आयोजन करणार
इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो 2026 मधील 'वेव्हज् क्रिएटर्स कॉर्नर' मध्ये 51 स्टार्टअप्स त्यांच्या एआय क्षेत्रातील नवोन्मेषांचे प्रदर्शन करणार
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारताच्या 'एआय-सक्षम सर्जनशील परिसंस्थे'वर प्रकाश टाकण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अडोब (Adobe) यांची भागीदारी
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दालनात 'मेड-इन-इंडिया' एआय लघुपट आणि आधुनिक आशय निर्मिती कार्यप्रवाहांचे सादरीकरण केले जाणार
Posted On:
16 FEB 2026 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दालनात चर्चासत्रे, मास्टरक्लास आणि तंत्रज्ञान प्रदर्शनांचे आयोजन होणार आहे. यामध्ये माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रावरील एआयच्या परिवर्तनात्मक प्रभावाचा शोध घेतला जाईल, ज्यामध्ये एआय-चलित उत्पादन कार्यप्रवाह, बहुभाषिक ध्वनी तंत्रज्ञान, गेमिंगमधील नाविन्यपूर्ण शोध, आशय मुद्रीकरण आणि दायित्वपूर्ण एआय ढाचा यांचा समावेश असेल. परस्परसंवादी एआय मायक्रो-ड्रामा कथाकथन, ऍडोबच्या सहकार्याने तयार केलेले 'कथावतार' (Kathāvatār) हे एआय-निर्मित लघुपट आणि चित्रपट निर्मितीची उत्क्रांती व सांस्कृतिक अस्सलतेवर आधारित शेखर कपूर यांचा 'एआय-चलित कथाकथन' यावरील मास्टरक्लास यांचा मुख्य आकर्षणांमध्ये समावेश आहे. या सत्रांमध्ये एलटीएम ब्लूव्हर्स, एडब्लूएस, एव्हर्जंट सोबत गुगल, सोनी रिसर्च इंडिया, पर्पलटॉक, डॅशव्हर्स, पॉकेट एफएम, कुकू एफएम आणि लुमिकाई यांसारख्या संस्थांच्या नाविन्यपूर्ण संशोधनांचे सादरीकरण केले जाईल, ज्यामुळे ज्ञान देवाणघेवाण, धोरणात्मक संवाद आणि जबाबदार एआय सर्जनशील सेवांमध्ये भारताच्या नेतृत्वाला चालना मिळेल.
51 स्टार्टअप्स करणार एआय नवोन्मेषांचे प्रदर्शन
इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो 2026 मध्ये, भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) आणि मीडिया टेक क्षेत्रातील 51 स्टार्टअप्स 'वेव्हज् क्रिएटर्स कॉर्नर' मध्ये त्यांच्या एआय-चलित नवोन्मेषांचे प्रदर्शन करतील. हे व्यासपीठ मंत्रमुग्ध करणारे कथाकथन, गेमिंग, आभासी निर्मिती आणि पुढच्या पिढीतील आशय तंत्रज्ञानावर आधारित आहे.यातील मुख्य आकर्षणांमध्ये 'झिरो-टच ऑटोनॉमस न्यूजरूम', बहुभाषिक डबिंग आणि एआय सांकेतिक भाषा अवतारांसह 'भाषा-वॉल', 'संवाद सेतू' आणि 'द डायरेक्टर्स चेअर' यांसारखे परस्परसंवादी अनुभव, एआय पॉडकास्ट स्टुडिओ, संवादात्मक ह्युमनॉइड रोबोट्स आणि व्हॉईस क्लोनिंग यांचा समावेश आहे. 'भाषासेतू' आणि 'कलासेतू' स्पर्धेतील विजेते देखील एआय-चलित साधनांचे सादरीकरण करतील, जी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि भाषिक सुलभता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. हे सर्व उपक्रम सर्जनशील तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे आहेत.

भारताच्या 'एआय-चलित सर्जनशील परिसंस्थे'वर प्रकाश टाकण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि ऍडोब यांची भागीदारी
ऍडोब, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने, भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' दरम्यान एमआयबी दालन आणि वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर' मध्ये एआय-चलित सर्जनशील उपक्रमांची मालिका सादर करणार आहे.
या सहकार्याचा एक भाग म्हणून, ऍडोब विशेष प्रकारे तयार केलेला 'कथावतार' (Kathāvatār) सादर करेल, जो भारतीय लोककथांवर आधारित पाच 'मेड-इन-इंडिया' एआय लघुपटांचा संग्रह आहे. 'लँग्वेज ऑफ बर्ड्स', 'मिगोई', 'उत्तरायण', 'द बार्बर्स सीक्रेट' आणि 'यापासॉरस' हे चित्रपट समिट दरम्यान वेव्हज् क्रिएटर्स कॉर्नरमधील 'एआय थिएटर'मध्ये प्रदर्शित केले जातील. हे प्रदर्शन कथाकथन आणि चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या नव्या पिढीवर प्रकाश टाकेल.

ऍडोब "द फ्युचर ऑफ फिल्म: एआय, क्रिएटिव्हिटी, अँड क्राफ्ट" या विषयावर एक विशेष सत्र देखील आयोजित करेल, जे एआय चित्रपट निर्मितीच्या उदयोन्मुख पद्धती आणि विकसित होत असलेल्या सर्जनशील कार्यप्रवाहांवर लक्ष केंद्रित करेल.
याव्यतिरिक्त, ऍडोब द्वारे संचालित 'कंटेंट क्रिएशन हब', आधुनिक आशय निर्मात्यांसाठी डिझाइन केलेले एआय-आधारित व्हिडिओ निर्मिती कार्यप्रवाह प्रदर्शित करेल. हे हब जलद निर्मिती, वर्धित सर्जनशीलता आणि मोठ्या प्रमाणावरील आशय विकासाला सक्षम करणाऱ्या साधनांची माहिती देईल.
या उपक्रमांच्या माध्यमातून, ऍडोब आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे एआय-सक्षम सर्जनशीलतेमध्ये भारताचे वाढते नेतृत्व प्रदर्शित करणे आणि मीडिया व मनोरंजन परिसंस्थेतील नवोन्मेषाला बळकटी देणे हे उद्दिष्ट आहे.
एआय थिएटर: भविष्यातील सिनेमाची नवी व्याख्या
नवी दिल्लीतील 'एआय इमर्सिव्ह थिएटर' 270-डिग्री प्रोजेक्शन, स्पेशल डिझाइन आणि एआय-चलित कथाकथनासह एक परिवर्तनात्मक सिनेमॅटिक अवकाश सादर करत आहे, जे प्रेक्षकांना परस्परसंवादी वातावरणात पूर्णपणे सामावून घेते. एक सांस्कृतिक केंद्र म्हणून कल्पिलेले हे थिएटर तंत्रज्ञान आणि कथानकाचा मिलाफ करून प्रेक्षक सहभागाची नवी व्याख्या मांडते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वेव्हज बाजार'च्या नेतृत्वाखाली, या प्रदर्शनात निवडक एआय चित्रपट, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) 'सिनेमएआय हॅकाथॉन'चे (CinemAI Hackathon) अंतिम स्पर्धक आणि भारत मंडपम येथील 'कथावतार'चे स्क्रिनिंग यांचा समावेश आहे. हे उपक्रम भारताला दायित्वपूर्ण एआय-चलित सिनेमाच्या अग्रस्थानी ठेवणारे आहेत.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228826)
अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada