पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचे पंतप्रधानांकडून स्मरण

Posted On: 14 FEB 2026 11:06AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये याच दिवशी पुलवामा येथे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूर वीरांचे स्मरण केले. त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, दृढ संकल्प आणि सेवेची भावना आपल्या सामूहिक स्मरणात सदैव कोरलेली राहील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या अटळ शौर्यापासून प्रत्येक भारतीयाला प्रेरणा आणि बळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

2019 मध्ये याच दिवशी पुलवामा येथे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूर वीरांचे स्मरण. त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, दृढ संकल्प आणि देशसेवेची भावना आपल्या सामूहिक स्मरणात सदैव कोरलेली राहील. त्यांच्या अटळ धैर्यापासून प्रत्येक भारतीयाला बळ आणि प्रेरणा मिळत राहील.

***

हर्षल आकुडे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2228010) अभ्यागत कक्ष : 16