पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बार्बाडोसमधील निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे केले अभिनंदन

Posted On: 13 FEB 2026 12:17PM by PIB Mumbai

 

बार्बाडोसमधील निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे अभिनंदन केले आहे. बार्बाडोससोबतच्या आपल्या दीर्घकालीन मैत्रीचा भारताला आदर आहे, सहकार्यविषयक विविध क्षेत्रांमध्ये ही मैत्री अधिक विस्तारत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी नमूद केले आहे. 2024 मधील भारत कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत झालेली भेट मला आठवते. दोन्ही देशांतील जनतेच्या हितासाठी आपली भागीदारी अधिक दृढ करण्याकरता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश 

पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक निवडणूक विजय मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

भारत बार्बाडोससोबतच्या आपल्या दीर्घकालीन मैत्रीला अत्यंत आदर करतो, ही मैत्री सहकार्य विषयक विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने विस्तारत आहे.

2024 मध्ये भारत कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत झालेली भेट मला आठवते आणि दोन्ही देशांतील जनतेच्या हितासाठी आपली भागीदारी अधिक दृढ करण्याकरता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.

@miaamormottley

नेहा कुलकर्णी / तुषार पवार/परशुराम कोर

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227844) अभ्यागत कक्ष : 10