पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

परीक्षा पे चर्चा उपक्रमाअंतर्गत परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुदृढतेवर भर दिला जात असल्याबद्दलचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक

Posted On: 12 FEB 2026 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. परीक्षा पे चर्चा उपक्रमाअंतर्गत कशारितीने नेहमीच परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुदृढतेला केंद्रस्थानी ठेवले गेले आहे, तसेच हा उपक्रम भीतीपेक्षा शिकण्याच्या वृत्तीचा कसा पुरस्कार करतो आणि आत्मविश्वास वाढवतो याची मांडणी या लेखात केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत नेहमीच परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुदृढतेला केंद्रस्थानी  ठेवले गेले आहे. हा उपक्रम भीतीपेक्षा शिकण्याच्या वृत्तीचा पुरस्कार करतो आणि आत्मविश्वास वाढवतो.

आपण आता परीक्षेच्या हंगामाकडे वाटचाल करत आहोत, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांचा हा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा आणि धैर्याने परीक्षांना सामोरे जा!

dailypioneer.com/news/the-spirit-of-pariksha-pe-charcha

NaMo ॲप द्वारे

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227213) अभ्यागत कक्ष : 9