पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांमधील कालातीत ज्ञानाचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
Posted On:
12 FEB 2026 10:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांमधील कालातीत ज्ञानाचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
"ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्।।"
या सुभाषितात असे म्हटले आहे,"ज्ञानी लोक म्हणतात की हे जग एका सनातन पिंपळाच्या वृक्षासारखे आहे, ज्याची मुळे वर आहेत आणि फांद्या खाली पसरलेल्या आहेत. त्याची पाने म्हणजे वेद आहेत. जो मनुष्य या संसाररूपी वृक्षाला जाणतो, तो वेदांचा खरा ज्ञाता समजला जातो."
ज्ञानाचा दीप केवळ अज्ञानाचा अंधःकार दूर करत नाही, तर तो संपूर्ण जगालाही प्रकाशित करतो आणि महर्षी दयानंद सरस्वतीजी हे याचे जिवंत उदाहरण आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
ज्ञानाचा दिवा केवळ अज्ञानाचा अंधःकार दूर करत नाही तर संपूर्ण जगाला उजळून टाकतो. महर्षी दयानंद सरस्वती यांचे दिव्य व्यक्तिमत्व याचे जिवंत उदाहरण आहे.
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्।।"
***
NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2226810)
अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam