पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स येथील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधानांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मदत केली जाहीर

प्रविष्टि तिथि: 05 FEB 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील पूर्व जैंतिया पर्वतरांगा भागात झालेल्या दुर्घटनेतील  जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना 'प्रधानमंत्री  राष्ट्रीय मदत' निधीमधून  2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’या समाज माध्‍यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे:

"मेघालयातील पूर्व जैंतिया पर्वतीय भागामध्‍ये झालेल्या दुर्घटनेमुळे  दुःख झाले आहे. ज्यांनी आपले  प्रियजन गमावले आहेत  त्यांच्याबद्दल  मी शोक संवेदना  व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.

प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना  प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये मदत देण्यात येईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2224171) आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam