पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बीटिंग रिट्रीट 2026 मधील क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 29 JAN 2026 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट 2026 मधील क्षणचित्रे सामायिक केली. विविध वाद्यवृंदांचे सादरीकरण संस्मरणीय होते, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी X वरील पोस्टच्या मालिकेत म्हणाले:

"बीटिंग रिट्रीट 2026 मधील ही काही क्षणचित्रे आहेत. विविध वाद्यवृंदांचे सादरीकरण संस्मरणीय होते."

 

"बीटिंग रिट्रीट 2026 मधील आणखी काही क्षणचित्रे."

 

"बीटिंग रिट्रीट 2026 मध्ये हवाई दलाचा बँड अतुलनीय होता.

त्यांनी 'ब्रेव्ह वॉरियर', 'ट्वायलाइट', 'अलर्ट (पोस्ट हॉर्न गॅलॉप)' आणि 'फ्लाइंग स्टार' चे अचूक  सादरीकरण केले.

सिंदूरचे सादरीकरण उत्कृष्ट  होते!"

 

"केवळ असामान्य!”

नौदल बँडच्या सादरीकरणात 'नमस्ते', 'सागर पवन', 'मातृभूमी', 'तेजस्वी' आणि 'जय भारती' यांचा समावेश होता.

“मत्स्य यंत्र रचना अत्यंत सुंदर होती.”

 

"बीटिंग रिट्रीट 2026 मधील सीएपीएफ बँडच्या विविध रचना चैतन्याने  भरलेल्या होत्या, त्यांनी  आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्यांबद्दल अभिमानाची भावना जागवली."

 

"बीटिंग रिट्रीट 2026 मध्ये आर्मी मिलिटरी बँडने सादर केलेली धुन उत्कृष्ट होती. ऑपरेशन सिंदूर, वंदे मातरमची 150 वर्षे, भारताच्या नारी शक्तीचा क्रिकेटमधील विजय, तसेच अश्नी ड्रोन, भैरव बटालियन आणि प्राचीन 'गरूड व्यूह' युद्ध रचनेची प्रतिकृती, अशा रचनाही तेवढ्याच उत्कृष्ट होत्या.”  

 

‘ड्रमर्स कॉल’

“नेत्रदीपक! बीटिंग रिट्रीट 2026 मध्ये त्याची मोठी प्रशंसा झाली."

 

“वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत असताना, बीटिंग रिट्रीट 2026 मधील आपल्या सशस्त्र दलांनी केलेले हे सादरीकरण खास आहे."

 

* * *

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2221012) अभ्यागत कक्ष : 18