पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप मिळाल्याच्या क्षणाची झलक सामायिक केली.

प्रविष्टि तिथि: 28 JAN 2026 10:38AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप मिळाल्याच्या क्षणाची झलक सामायिक केली.

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन आणि मी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप मिळाल्याचे  घोषित करत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे." आज भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरुप प्राप्त होणे, हा आपल्या परस्पर संबंधांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे प्रत्यक्षात शक्य करण्यासाठी गेली कित्येक वर्षे सकारात्मक भावनेने आणि निर्धाराने प्रयत्न करणाऱ्या युरोपच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. या करारामुळे आर्थिक बंध वृद्धिंगत होतील, आपल्या नागरिकांसाठी रोजगार निर्माण होतील आणि समृद्ध भविष्यासाठी भारत-युरोप यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत होईल." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

एक्स समाजमाध्यमावर  लिहिलेल्या पोस्ट्समध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:

 युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना. 

@eucopresident

@vonderleyen

@EUCouncil

@EU_Commission

"युरोपियन संघाबरोबर झालेला ऐतिहासिक करार हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा  मुक्त व्यापार करार असून त्यामुळे भारतातील  1.4 अब्ज लोकांना महत्त्वपूर्ण लाभ मिळतील. यामुळे खालील गोष्टी घडतील:

आपले शेतकरी आणि लघु उद्योगांना युरोपियन संघ बाजारपेठेत सहज प्रवेश मिळेल.

 उत्पादन क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील.

आपल्या सेवा क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ होईल. #IndiaEUTradeDeal”

"जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या आणि चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये झालेल्या या ऐतिहासिक करारामुळे अगणित संधी निर्माण होतील आणि सहकार क्षेत्रासाठी समृद्धीची नवीन कवाडे खुली होतील. या करारामुळे संपूर्ण जागतिक समुदायाला लाभ होईल.

यामुळे प्रमुख क्षेत्रांमध्ये दर्जेदार नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल, आपले तरुण, व्यावसायिक प्रतिभावान व्यक्ती, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी पुढील प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि डिजिटल युगाची क्षमता प्रत्यक्षात आणता येईल. महत्त्वाचे म्हणजे यामुळे नवोन्मेषाला चालना मिळेल आणि परस्पर विकासासाठी आर्थिक बंध बळकट होतील.

भारत आणि युरोपियन संघ एकत्रितपणे विश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर एका समृद्ध आणि शाश्वत भविष्याकडे वाटचाल करत आहेत. ! #IndiaEUTradeDeal”

"आजचा दिवस कायम स्मरणात राहील, आपल्या सामायिक इतिहासात तो अविस्मरणीयपणे नोंदवला जाईल.

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन आणि मला  भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप मिळाल्याची घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे.

हा आपल्या संबंधातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

यामुळे खालील गोष्टी होतील:

आपले आर्थिक संबंध दृढ होतील.

आपल्या तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होईल.

आपल्या उद्योगांना संधी मिळतील.

सामायिक समृद्धीला चालना मिळेल

मजबूत जागतिक पुरवठा साखळी निर्माण होईल. #IndiaEUTradeDeal”

@eucopresident

@vonderleyen

@EUCouncil

@EU_Commission

"भारत आणि युरोप यांनी आज एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. भारत- युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे समृद्धी, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्य या क्षेत्रात नवीन मार्ग निर्माण होतील.

#IndiaEUTradeDeal

@eucopresident

हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नवोपक्रमाला चालना देईल, तसेच आपले सामरिक संबंध अधिक दृढ करेल.

हा करार स्थिर, समृद्ध आणि भविष्यासाठी सज्ज असे आर्थिक संबंध निर्माण करण्याच्या आमच्या सामायिक निश्चयाचे प्रतिबिंब आहे.

 #IndiaEUTradeDeal

@EU_Commission

@vonderleyen

 

"भारत-युरोपियन संघ व्यापार मंचाला संबोधित करतानाच्या माझ्या प्रतिक्रिया सामायिक करत आहे."

आज भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरुप प्राप्त होणे, हा  आपल्या परस्पर संबंधांमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे प्रत्यक्षात शक्य करण्यासाठी गेली कित्येक वर्षे सकारात्मक भावनेने आणि निर्धाराने प्रयत्न करणाऱ्या युरोपच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. या करारामुळे आर्थिक बंध वृद्धिंगत होतील, आपल्या नागरिकांसाठी रोजगार निर्माण होतील आणि समृद्ध भविष्यासाठी भारत-युरोप यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत होईल.”

"या कराराच्या पूर्णत्त्वामुळे भारत आणि युरोपियन संघ यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याची आमची वचनबद्धता अधिक दृढ होईल." 

भारत आणि युरोप यांच्यातील विविध क्षेत्रातील आर्थिक संबंधांवर चर्चा करण्यासाठी भारत-युरोपियन संघ व्यापार मंच हे एक मोठे व्यासपीठ आहे.  आज स्वाक्षरी झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योग, एमएसएमई आणि नवोन्मेषकांना अमाप संधी उपलब्ध होतील. सामायिक समृद्धीसाठी हा एक नवीन आराखडा आहे.”

@EU_Commission

@vonderleyen

***

NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219560) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam