पंतप्रधान कार्यालय
थिरू डी. ज्ञानसुंदरम् जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2026 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. ज्ञानसुंदरम् यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
तामिळ संस्कृती आणि साहित्य यांच्यासाठी डी. ज्ञानसुंदरम् जी यांचे योगदान कायमच स्मरणात राहील असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांच्या लेखन आणि आजीवन समर्पणातून त्यांनी समाजाची सांस्कृतिक जाणीव समृद्ध केली आणि त्यांचे कार्य वाचक आणि विद्वानांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
जानेवारी 2024 मध्ये श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची आठवणही पंतप्रधानांनी करून देताना, कंब रामायणाविषयीचे त्यांचे ज्ञान विलक्षण असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी शोकमग्न कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त केल्या आणि दिवंगत आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थनाही केली.
एक्स या समाज माध्यमांवरील संदेशात मोदी म्हणाले की,
'थिरू डी ज्ञानसुंदरम् जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. तामिळ संस्कृती आणि साहित्य यांमधील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या लेखन आणि आजीवन समर्पणातून त्यांनी समाजाची सांस्कृतिक जाणीव समृद्ध केली आणि त्यांचे कार्य वाचक आणि विद्वानांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
जानेवारी 2024मध्ये श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची आठवणही पंतप्रधानांनी करून देताना, कंब रामायण याविषयीचे त्यांचे ज्ञान विलक्षण असल्याचे नमूद केले.
त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती'
* * *
नेहा कुलकर्णी/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219086)
आगंतुक पटल : 7