पंतप्रधान कार्यालय
उत्साह आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
कर्तव्य पथावरील भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी सामायिक केली
आमच्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्यात युरोपीयन कौन्सिलचे अध्यक्ष अंतोनियो कोस्टा आणि युरोपीयन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्होन डर लेयेन यांचे आतिथ्य करण्याचे भाग्य लाभल्याचा भारताला अभिमान आहे: पंतप्रधान
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रदर्शित करण्यात आलेल्या भक्कम सुरक्षा यंत्रणांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रजासत्ताक दिन संचलनातून भारताच्या सुरक्षा दलांच्या बळकट क्षमता दिसून येतात - पंतप्रधान
प्रजासत्ताक दिन संचलनातून दिसलेला भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा चैतन्यदायी आविष्कार पंतप्रधानांनी अधोरेखित केला
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2026 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारताने अमाप उत्साह आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
कर्तव्य पथावरील भव्य संचलनातून भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य, त्याच्या वारशाची समृद्धता आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या ऐक्याचे दर्शन घडले ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या सोहोळ्याची क्षणचित्रे सामायिक करताना ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या सोहोळ्यादरम्यान कर्तव्य पथावर राष्ट्राभिमानाचा सशक्त आविष्कार बघायला मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की प्रजासत्ताक दिन सोहोळ्यामध्ये युरोपीयन कौन्सिलचे अध्यक्ष अंतोनियो कोस्टा आणि युरोपीयन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्होन डर लेयेन यांचे आतिथ्य करण्याचा मान भारताला लाभला. त्यांच्या उपस्थितीने भारत-युरोपीय महासंघ भागीदारी तसेच सामायिक मूल्यांप्रती भारताची बांधिलकी यांची वाढती ताकद अधोरेखित झाली असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की या दोघांची ही भेट विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि युरोप यांचा सहभाग आणि सहकार्य आणखी दृढ करण्याला गती देईल.
भारताची सज्जता, तांत्रिक क्षमता आणि नागरिकांच्या संरक्षणाप्रती अढळ कटिबद्धता यांचे दर्शन घडवत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाने देशाच्या भक्कम सुरक्षा यंत्रणांचे सादरीकरण केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या संचलनातून भारताच्या सुरक्षा दलांच्या क्षमतांच्या बळकटीकरणाची झलक दिसून येते. भारताची सुरक्षा दले खऱ्या अर्थाने देशाचा अभिमान आहेत हे सांगून त्यांनी संचलनादरम्यान या दलांची ठळक उपस्थिती अधोरेखित करणारी क्षणचित्रे सामायिक केली.
पंतप्रधान म्हणाले की प्रजासत्ताक दिन सोहोळ्यादरम्यान कर्तव्य पथावर भारताच्या सांस्कृतिक कलाकृतींचे भव्य सादरीकरण बघायला मिळाले. भारताच्या समृध्द आणि वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडवत या संचलनाने चैतन्यदायी सादरीकरणे तसेच चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा केला याची मोदी यांनी नोंद घेतली.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणतात;
“भारताने अत्यंत उत्साह आणि अभिमानाने प्रजासत्ताक दिन साजरा केला.
कर्तव्य पथावरील भव्य संचलनातून आपल्या लोकशाहीचे सामर्थ्य, आपल्या वारशाची समृद्धता आणि आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या ऐक्याचे दर्शन घडले.
ही पहा काही क्षणचित्रे.....”
“आज प्रजासत्ताक दिन सोहोळा सुरु असताना कर्तव्य पथावर राष्ट्राभिमानाचे सामर्थ्यशाली दर्शन घडले.
ही पहा आणखी काही क्षणचित्रे.....”
“आमच्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्यात युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष अंतोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्होन डर लेयेन यांचे आतिथ्य करण्याचे भाग्य लाभल्याचा भारताला अभिमान आहे.
त्यांची उपस्थिती भारत-युरोपीयन महासंघ भागीदारी तसेच सामायिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी यांची वाढती ताकद अधोरेखित करते.
ही भेट विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि युरोप यांचा सहभाग आणि सहकार्य आणखी दृढ करण्याला गती मिळवून देईल.
@antoniocostapm
@vonderleyen
@EUCouncil
@EU_Commission”
“भारताची सज्जता, तांत्रिक क्षमता आणि नागरिकांच्या संरक्षणाप्रती अढळ कटिबद्धता यांचे दर्शन घडवत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाने देशाच्या भक्कम सुरक्षा यंत्रणांचे सादरीकरण केले.”
“प्रजासत्ताक दिन संचलनातून भारताच्या सुरक्षा दलांच्या क्षमतांच्या बळकटीकरणाची झलक दिसून आली. आमची सुरक्षा दले खऱ्या अर्थाने आमचा अभिमान आहेत!
ही पहा आणखी काही क्षणचित्रे.....”
“आज सकाळी कर्तव्य पथावर भारताच्या सांस्कृतिक कलाकृतींचे भव्य सादरीकरण बघायला मिळाले. चैतन्यदायी सादरीकरणे तसेच चित्ररथांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन संचलनाने भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा केला.”
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218876)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam