पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर मार्क टुली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 7:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारितेतील बुलंद आवाज असलेल्या सर मार्क टुली यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, सर मार्क टुली यांचा भारत आणि येथील लोकांशी असलेला खोल संबंध त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या वार्तांकनाने आणि विचारांनी सार्वजनिक चर्चेवर दीर्घकालीन प्रभाव टाकला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सर मार्क टुली यांच्या कुटुंबीयांप्रति, मित्रांप्रति आणि चाहत्यांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहले;
“पत्रकारितेतील एक बुलंद आवाज असलेल्या सर मार्क टुली यांच्या निधनामुळे दुःख झाले. भारत आणि आपल्या देशातील लोकांशी त्यांचा असलेला जिव्हाळा त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या वार्तांकनाने आणि विचारांनी सार्वजनिक चर्चेवर दीर्घकालीन ठसा उमटवला आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रति शोकसंवेदना.”
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218671)
आगंतुक पटल : 5
|

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218671)
|
|