पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण धर्म संघोम ट्रस्टच्या स्वामींची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 4:02PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्कला येथील शिवगिरी मठातील श्री नारायण धर्म संघोम ट्रस्टशी संबंधित स्वामींची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी सामाजिक सेवा, शिक्षण, अध्यात्म आणि सामुदायिक कल्याण या क्षेत्रातील स्वामींच्या समर्पित कार्याचे कौतुक केले, त्यांच्या प्रयत्नांनी भारताच्या सामाजिक रचनेत चिरस्थायी योगदान दिले आहे.
श्री नारायण गुरु यांच्या कालातीत मूल्यांमध्ये रुजलेल्या ट्रस्टचे विविध उपक्रम समाजात समानता, सलोखा आणि प्रतिष्ठा यांना प्रोत्साहन देत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"वर्कला येथील शिवगिरी मठातील श्री नारायण धर्म संघोम ट्रस्टशी संबंधित स्वामींची भेट घेतली. सामाजिक सेवा, शिक्षण, अध्यात्म आणि सामुदायिक कल्याण याक्षेत्रातील समर्पित कार्याने सामाजिक रचनेत चिरस्थायी योगदान दिले आहे.
श्री नारायण गुरु यांच्या कालातीत मूल्यांमध्ये रुजलेल्या ट्रस्टचे विविध उपक्रम समाजात समानता, सलोखा आणि प्रतिष्ठा यांना प्रोत्साहन देत आहेत."
***
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2217983)
आगंतुक पटल : 5