माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दावोसमध्ये भारताचा प्रभावी, दमदार प्रारंभ
भारतीय एआय मॉडेल्स जागतिक समस्यांसाठी अधिक प्रासंगिक ; पाचव्या औद्योगिक क्रांतीच्या युगात आम्ही कमी किमतीत जास्तीत जास्त लाभ प्रदान करतो : अश्विनी वैष्णव
एआयमुळे भारतात तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण; कार्यक्षम सेवा देण्यासाठी होते एआयची मदत : अश्विनी वैष्णव
'एआय पॉवर प्ले' पॅनेलमध्ये भारताने जागतिक एआय शक्ती म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले , आयएमएफ क्रमवारीला दिले आव्हान
एआय प्रशासनाबाबत आमच्या तांत्रिक-कायदेशीर दृष्टिकोनातून पूर्वग्रह , डीपफेक आणि विश्वासाशी संबंधित समस्यांवर उपाय सुचवेल : अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव "एआय पॉवर प्ले" या उच्चस्तरीय जागतिक पॅनेल चर्चेत झाले सहभागी; या चर्चेमध्ये कृत्रिम प्रज्ञेचे विकसित होणारे भौगोलिक राजकारण , त्याचा आर्थिक परिणाम, प्रशासनासमोरची आव्हाने आणि समावेशक प्रसाराचे मार्ग यावर भर देण्यात आला होता. या चर्चेच्या निमित्ताने आघाडीचे जागतिक धोरणकर्ते, उद्योग धुरिण आणि बहुपक्षीय संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी विविध देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शक्ती, उत्पादकता आणि धोरण यांना कसा आकार देत आहे यावर चर्चा केली.

या गट चर्चेचे संचालन इयान ब्रेमर (अध्यक्ष आणि संस्थापक, युरेशिया ग्रुप) यांनी केले, तर इतर सदस्यांमध्ये ब्रॅड स्मिथ (उपाध्यक्ष आणि अध्यक्ष, मायक्रोसॉफ्ट), क्रिस्टालिना जॉर्जिएवा (व्यवस्थापकीय संचालक, जागतिक नाणे निधी) आणि खालिद अल-फालिह (गुंतवणूक मंत्री, सौदी अरेबिया) यांचा समावेश होता.

जागतिक ए-आय संरेखन आणि भू-राजकारणावरील प्रश्नाला उत्तर देताना, ते म्हणाले की, भारत स्पष्टपणे एआय राष्ट्रांच्या पहिल्या गटात आहे. त्यांनी नमूद केले की, एआय आर्किटेक्चरमध्ये पाच स्तर आहेत - अनुप्रयोग, मॉडेल, चिप, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा; या पाचही स्तरांवर भारत सक्रियपणे काम करत आहे. ते म्हणाले की, अनुप्रयोग स्तरावर, भारत कदाचित जगाला सेवा पुरवणारा सर्वात मोठा देश असेल. कृत्रिम प्रज्ञेमधील गुंतवणुकीवरील परतावा (आरओआय), हा केवळ खूप मोठी मॉडेल्स तयार करण्याने मिळत नाही, तर तो ‘एंटरप्राइझ’-स्तरावर केलेल्या अंमलबजावणीतून आणि उत्पादकतेतील वाढीमधून मिळतो, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी निरीक्षण नोंदवले की, ए-आय वापराशी संबंधित जवळजवळ 95 टक्के समस्या 20-50 अब्ज पॅरामीटर्सच्या मॉडेल्सद्वारे सोडवल्या जाऊ शकतात असे निरीक्षण नोंदवून मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, यापैकी अनेक मॉडेल्स भारताकडे आधीच आहेत, आणि ती विविध क्षेत्रांमध्ये वापरली जात आहेत.
भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या यशाशी तुलना करताना वैष्णव म्हणाले की, केंद्र सरकार जीवनाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा पद्धतशीर प्रसार करत आहे. जीपीयू अर्थात ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स’ची उपलब्धता हे एक मोठे आव्हान असून भारताने खाजगी-सार्वजनिक भागीदारी प्रारुप स्वीकारले आहे. सुमारे 38,000 जीपीयूंना एक सामान्य राष्ट्रीय संगणकीय सुविधा म्हणून समाविष्ट केले आहे, असे ते म्हणाले. ही सुविधा केंद्रसरकार सक्षम आणि अनुदानित स्वरूपातील असून विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना जागतिक किमतीच्या एक तृतीयांश इतक्या किंमतीला किफायतशीर दराने ते उपलब्ध करुन दिले जातील, असे सांगून त्यांनी भारताच्या कृत्रिम प्रज्ञा धोरणाच्या प्रमुख चार स्तंभांविषयी माहिती दिली.
कृत्रिम प्रज्ञेवरील नियंत्रणासाठी तांत्रिक-कायदेशीर दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे नियंत्रण आणि प्रशासन याविषयी बोलताना वैष्णव यांनी सांगितले. नियंत्रण हे संपूर्णपणे कायद्यावर अवलंबून राहू शकत नाही,तर पूर्वग्रह आणि ‘डीपफेक’ सारख्या धोक्यांना आवर घालण्यासाठी त्याला तांत्रिक साधनांची साथ असणे आवश्यक आहे. "उदारहरणार्थ ‘डीपफेक’ शोध यंत्रणांमध्ये अचूकता असली पाहिजे ज्यांची सत्यता न्यायालयात पडताळणे शक्य होईल, भारत डीपफेकचा शोध घेण्यासह पूर्वग्रह कमी करणे आणि आणि एंटरप्राइझमध्ये तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी मॉडेल्सचे योग्य रीतीने ‘अनलर्निंग’ सुनिश्चित करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत आहे, असे ते म्हणाले.
इतर वक्त्यांनीही जागतिक कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात भारताच्या वाढत्या भूमिकेची दखल घेतली. इयान ब्रेमर यांनी नमूद केले की, गेल्या दशकात भारत एक महत्त्वपूर्ण भू-राजकीय आणि तांत्रिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. तर जागतिक संस्था आणि उद्योगांच्या प्रतिनिधींनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक आदर्श म्हणून भारताच्या प्रसार, सुलभता आणि सार्वभौम क्षमतेवरील भर अधोरेखित केला.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217100)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
Odia
,
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam